शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देश पुढे जावा, आधुनिक व्हावा या दिशेने करतोय काम - मोदी

By admin | Updated: June 27, 2017 23:38 IST

गेल्या तीन वर्षांत आमच्या सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली आहेत. देश पुढे जावा, आधुनिक व्हावा या दिशेने आम्ही काम

ऑनलाइन लोकमत
द हेग, दि. 27  - गेल्या तीन वर्षांत आमच्या सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली आहेत.  देश पुढे जावा, आधुनिक व्हावा या दिशेने आम्ही काम करत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज द हेग येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित करताना सांगितले. तसेच मनाने आपल्या देशाशी एकरूप राहा, आपल्या जीवनाला भारतीयमय बनवा, असे आवाहनही त्यांनी भारतीय वंशाच्या नागरिकांना केले. यावेळी सुमारे तीन हजार भारतीय उपस्थित होते. हेग येथे भारतीयांना संबोधित करताना मोदींनी जनधन योजना, मुद्रा योजना यांसह विविध योजनांचा आणि विकासकामांचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. तसेच महिला सक्षमीकरणासाठी सरकारकडून करण्यात येत असलेले कामाचा विशेष उल्लेख केला. तसेच अंतराळ संशोधनात देश करत असलेली प्रगती, शेती उत्पादनातील वाढ याचाही उल्लेख केला.
 मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे 
- देश पुढे जावा, आधुनिक व्हावा या दिशेने आम्ही काम करत आहोत
-   डच नागरिकांना पाच वर्षांसाठी टुरिस्ट आणि बिझनेस व्हिसा 
-  अंतराळ संशोधनात देशाने नाव मिळवले आहे 
- कोळशापेक्षा सौरऊर्जा अधिक स्वस्त मिळत आहे, त्यामुळे देश स्वयंपूर्ण होईल 
-  सुरक्षा क्षेत्रात महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत
-भारताच्या विकासात नारीशक्तीचा वाटा मोठा 
- जनधन योजना, मुद्रा योजना यामुळे सर्वसामान्यांना फायदा
- सरकारकडे प्रत्येक समस्येवर उपाय असू शकत नाही, त्यासाठी लोकसहभाग आवश्यक
- भारतात सव्वाशे कोटी देशवासिय देश चालवतात 
- भारतातील नव्या सरकारने लोकसहभागातून काम करण्यास प्राधान्य दिले आहे
- परदेशात सरकारचे दुतावास असतात, तिथे राजदूत असतात, पण परदेशात राहणारा भारतीय नागरिक हा राष्ट्रदूत 
-नेदरलँडमध्ये युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक भारतीय राहतात
- पासपोर्टचा रंग बदलला म्हणून रक्ताचा रंग बदलत नाही 
 - देश सोडला तरी आपले भारतीयत्व सोबत आणणाऱ्या आपल्या पूर्वजांना नमन