शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

Coronavirus:‘कोरोना’बाहेरचं जग! ‘असे’ देश जिथं अजून कोरोना पोहोचला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 01:28 IST

असे एकूण ३० देश आणि भूभाग आहेत, त्यांनी कोरोना संसर्गाचा रुग्ण सापडल्याचे मान्य केलेले नाही म्हणजे त्यांच्या देशात कोरोना पोहोचलेलाच नसेल असं नाही.

युरोप, आशिया, दक्षिण अमेरिका आपण म्हणतो जगभरात कोरोना पोहोचला. त्यानं जात-धर्म-देश-पंथ-लिंग सगळ्या सीमा भेदल्या आणि माणूसपणाच्या पातळीवर आणून उभं केलं जगभरातल्या माणसांना!

हे खरंच आहे. जगभरातील विविध देशांमध्ये मिळून ३४ लाख ६० हजार लोकांना (२ मे २०२० पर्यंतची आकडेवारी) कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. एकूण २१७ देशांनी आपल्या देशात कोरोना पोहोचल्याचं मान्य करत आकडेवारी जगजाहीर केली आहे.मात्र, जगभरात आजही ३० देश आहेत, जिथं कोरोना विषाणू पोहोचलेला नाही किंवा त्या देशांनी हे जाहीर केलेलं नाही की आमच्याकडे कोरोनाचा रुग्ण सापडला आहे.

असे एकूण ३० देश आणि भूभाग आहेत, त्यांनी कोरोना संसर्गाचा रुग्ण सापडल्याचे मान्य केलेले नाही म्हणजे त्यांच्या देशात कोरोना पोहोचलेलाच नसेल असं नाही. उदा. उत्तर कोरिया. या देशानं अजून मान्य केलेलं नाही की, आपल्या देशात कोरोना संसर्गाचे रुग्ण आहेत.पण म्हणजे त्यांच्याकडे हे रुग्ण नसतीलच असं नाही असा जगभरातल्या अनेक देशांना संशय आहे. चीन, रशिया आणि दक्षिण कोरियाच्या सीमा ज्या उत्तर कोरियाला लागून आहेत तिथं कोरोना विषाणू पोहोचलाच नाही, हे सरकारचं म्हणणं जरा संशयास्पद आहे. मात्र, असे संशय बाजूला ठेवले तरी उत्तर कोरियासह जगभरात असे ३० देश आणि भूभाग आहेत जिथं कोरोनाचा संसर्ग झालेला नाही.जिथं कोरोना पोहोचला नाही, ते देश तसे दुरस्थ आहेत. छोटे भूभाग आहेत. काहीतर प्रशांत महासागरातली बेटं आहेत. जागतिक आरोग्य संस्था, संयुक्त राष्ट्र संघ आणि रॉयटर्स वृत्तसेवा यांनी एकत्रित ही माहिती जमवली आहे.

ते देश असे..युरोप : स्वलबर्ड आणि जान माये इजलँड.आशिया : नॉर्थ कोरिया आणि तुर्कमेनिस्तान.दक्षिण अमेरिका : बाऊवेट इजलँड, साऊथ जॉर्जिया, साऊथ सँडविच इजलँड.आफ्रिका : ब्रिटिश इंडियन ओशन टेरटरी, फ्रेंच साऊथर्न टेरेटरी, लेसोथो, सेंट हेलेना.ओशेनिया : आफ्रिकन सोमोआ, ख्रिश्चन इजलँड, कोको (किंलिंग) इजलँड, कूक इजलँड, हर्ड इजलँड , मॅकडोनाल्ड इजलँड, किरीबाती, मार्शल इजलँड, मायक्रोनेशिया, न्यूरू, निअू, नॉरफोक इजलँड, पलाओ, पिटकेर्न, समोआ, सोलोमन इजलँड, टोकेवू, टोंगा, टुवालो, युनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेइंग इजलँड, वनावतू, वॅलिस अँड फ्युच्युरा इजलँड.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या