शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: एक छदामसुद्धा देणार नाही; ८० लाख निकृष्ट मास्क पाठवणाऱ्या चीनविरोधात 'या' पंतप्रधानांचा आक्रमक पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 10:01 IST

चीनकडून पुन्हा दुय्यम दर्जाच्या मास्कचा पुरवठा; १ कोटी १० लाखपैकी ८० लाख मास्क निकृष्ट

ओटावा: चीनमधून कोरोनाचा झालेला प्रसार, त्याबद्दलची माहिती जगाला देण्यास चीननं केलेला उशीर यामुळे चीनबद्दल संशयाचं वातावरण आहे. त्यातच आता चीन अनेक देशांना पुरवत असलेलं वैद्यकीय साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याची माहिती समोर येत असल्यानं संशय आणखी वाढू लागला आहे. युरोपियन देशांपाठोपाठ आता चीननं कॅनडाला निकृष्ट दर्जाचे मास्क पाठवले आहेत. मात्र या मास्कचे पैसे आम्ही देणार नसल्याचं म्हणत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडोंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी कॅनडा सरकारनं चीनकडून १ कोटी १० लाख मास्क मागवले होते. मात्र यातले केवळ १० लाख मास्क चांगल्या दर्जाचे असल्याचं आढळून आलं. तर १६ लाख मास्कची चाचणी अद्याप सुरू आहे. निकृष्ट दर्जाच्या मास्कचे पैसे कॅनडा देणार नसल्याचं त्रुडोंनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं. 'कॅनडा निकृष्ट दर्जाच्या पीपीईंचे पैसे देणार नाही. आमच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्तम दर्जाचे मास्क हवेत,' असं त्रुडो म्हणाले.चीनकडून आलेले दुय्यम दर्जाचे मास्क आणि त्यावर कॅनडावर दिलेली प्रतिक्रिया यामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत. याआधी २०१८ मध्ये चिनी कंपनी हुवेईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कॅनडाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्हॅन्कुवरमध्ये अटक केली. प्रत्युत्तरादाखल चिनी अधिकाऱ्यांनी कॅनडाच्या दोन दुतांविरोधात अटकेची कारवाई केली. त्यामुळे दोन देशांच्या संबंधांमध्ये कटुता आली. त्यात आता मास्क प्रकरणामुळे भर पडली आहे.त्याआधी तैवाननं ५ लाख मास्क देणगी स्वरुपात कॅनडाला दिले होते. तैवानच्या या मदतीचं त्रुडोंनी कौतुक केलं होतं. त्यामुळे चीन नाराज झाला. अमेरिका आणि जपान नेतृत्त्व करत असलेल्या राष्ट्रगटांमध्ये कॅनडाचाही समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेमध्ये तैवानला निरीक्षक म्हणून संधी मिळावी, अशी भूमिका कॅनडानं मांडली होती. मात्र चीननं त्याला कडाडून विरोध केला. तैवान स्वतंत्र राष्ट्र नसल्याचं चीन मानतो. त्यामुळे त्यांना राष्ट्रगटात संधी देण्याचा प्रश्नच येत नसल्याची चीनची भूमिका आहे.देशातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता; पण आता बरंच काही बदलणार?आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सरकार अटक करणार का?; भाजपाचा सवाललॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्राचिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप