शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

CoronaVirus : असा खतरनाक व्हेरिएंट येणार, कोरोना लसही कुचकामी ठरणार? इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी वाढवलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 11:17 IST

"ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांच्यापासून संसर्ग पसरू नये; ...तर मोठ्या प्रमाणावर वाढेल मृत्यूदर!"

लंडन - इंग्लंड सरकारच्या अधिकृत वैज्ञानिक सल्लागार गटाने (SAGE) आगामी काळात अत्यंत घातक सुपर-म्युटेंट कोरोना व्हायरस व्हेरिएंटच्या धोक्याचा इशारा दिला आहे. या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, की हा विषाणू विद्यमान लसींना प्रभावशून्य करेल. त्यांनी इशारा दिला आहे, की व्हायरसला पूर्ण पणे नष्ट करणे कठीण आहे आणि म्हणूनच नव-नवे व्हेरिएंट येत राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, अँटीजेनमध्ये भिन्नतेच्या मदतीने लस कुचकामी ठरतील. यामुळे वेरिएंट्स येत राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, अँटीजेनमध्ये व्हेरिएशनच्या मदतीने लस कुचकामी होऊ शकते.

अनेक व्हेरिएंट आले समोर - अहवालानुसार, ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांच्यापासून संसर्ग पसरू नये, हे लक्ष्य असायला हवे. तसेच, गेल्या काही महिन्यात, असे अनेक व्हेरिएंट समोर आले आहेत, जे लसीपासून वाचले आहेत. पण, पूर्णपणे प्रभावशून्य करू शकले नाही. तथापि, जसजसे लसिकरण पुढे जाईल तसतसे अनेक विषाणू त्यांच्यापासून संरक्षण विकसित करण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच प्रसारण थांबवणे अत्यंत महत्वाचे आहे.

CoronaVirus Third wave: चिंतेत भर! देशात कोरोना व्हायरसचा प्रजनन दर वाढला; एम्स, सीएसआयआरनं दिला गंभीर इशारा

...तर मोठ्या प्रमाणावर वाढेल मृत्यूदर - या अहवालात वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे, की सुपर म्यूटेंट व्हेरिएंटमुळे तीन पैकी एका व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. तज्ञांचे म्हणणे आहे, की यैणारा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या बीटा आणि केंटमध्ये आढळलेल्या आल्फा अथवा भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटने मिळून बनला, तर तो लसीलाही कुचकामी करेल. यामुळे मृत्यूदर वाढण्याचीही शक्यता आहे.

लॉकडाउन संपवण्यापूर्वी इशारा - या अहवालाच्या आधारे तज्ज्ञांनी पुन्हा एकदा इंग्लंडमधील लॉकडाऊन निर्बंध संपविण्याच्या सरकारच्या तयारीसंदर्भात इशारा दिला आहे. SAGE अहवाल दर्शवतो, की अद्याप व्हायरसने पिछा सोडलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात सरकारने अधिक सतर्क असण्याची गरज आहे. तसेच सरकारने हिवाळ्यापर्यंत जनतेला बूस्टर शॉट द्यावा, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसEnglandइंग्लंडdoctorडॉक्टर