शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

CoronaVirus अमेरिकेमध्ये औषध कंपनीनेच पसरवला कोरोना? बायोजनवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 07:46 IST

फेब्रुवारीमध्ये कंपनीची वार्षिक आढावा बैठक झाली होती. तेव्हा या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. या बैठकीला उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांना प्रकृती अस्वास्थ्य किंवा कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती. यामुळे ते आपापल्या घरी गेले होते.

न्यूयॉर्क : अमेरिकेमध्ये दिवसाला १५०० हून अधिक मृत्यू होत आहेत. तरीही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लॉकडाऊन उठविण्याच्या विचारात आहेत. अशावेळी अमेरिकेमध्ये डब्यात गेलेल्या एका कंपनीला मोठा फायदा झाला आहे. अनेक वर्षांच्या अपयशानंतर बायोजन या औषध कंपनीच्या अल्झायमरवरील औषधाने चांगले परिणाम दाखविले आहेत. यामुळे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माइकल वोनाटसोस खूपच उत्साहित दिसत आहेत. यामुळे कुठेतरी संशयाची पाल चुकचुकत आहे. 

वोनाटसोस यांच्या चेहऱ्यावर मार्च महिन्यापासूनच तेज पहायला मिळत आहे. त्यांना फेब्रुवारीमध्ये बोस्टनच्या पत्रकार परिषदेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता. चीनमधील कोरोना व्हायरसमुळे त्यांच्या कंपनीचे प्लॅन आणि पुरवठा बाधित होणार नाही का? यावर वोनाटसोस यांनी नकारात्मक उत्तर देत आता पर्यंत सारे ठीक सुरु असल्याचे म्हटले होते. मात्र, जेव्हा ते हे सांगत होते, तेव्हाच बायोजनचे काही वरिष्ठ अधिकारी युरोपहून अमेरिकेमध्ये परतले होते. त्यांच्यामुळे अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरण्यास सुरुवात झाली होती. 

फेब्रुवारीमध्ये कंपनीची वार्षिक आढावा बैठक झाली होती. तेव्हा या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. या बैठकीला उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांना प्रकृती अस्वास्थ्य किंवा कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती. यामुळे ते आपापल्या घरी गेले होते. मात्र, हे अधिकारी अमेरिकेतल्या सहा राज्यांतील असल्याने त्यांच्यामुळे त्यांच्या घरच्यांनाही कोरोनाची लागण झाली. हा व्हायरस एवढा झपाट्याने पसरला की अमेरिकेमध्ये काही दिवसांतच १० हजार रुग्णांचा आकडा पार झाला. यामुळे अमेरिकेमध्ये बायोजनला कोरोना पसरविण्यासाठी सर्वांत मोठा दोषी मानण्यात येत आहे. हे सारे अशा वर्गातील लोकांनी केले, ज्यांना उच्चशिक्षित आणि समजूतदार समजले जाते. 

मॅसॅच्यूसेट्समध्ये बायोजेनच्या ९९ कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचे संक्रमन झाले होते. त्यांच्यामुळे कोरोना झालेल्या रुग्णांचा आकडा अद्याप मोजण्यात आलेला नाही. मात्र, ही संख्या हजारात जाण्याची शक्यता आहे. इंडियानामध्ये दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले होते. टेनेसी एक आणि उत्तरी कॅरोलिनामध्ये सुरुवातीला सापडलेले ६ जण याच कंपनीचे होते. 

कंपनीने नावे लपविलीबायोजनच्या काही उपाध्यक्षांनी या बैठकीला युरोपमध्ये हजेरी लावली होती. ते अमेरिकेमध्ये परतले तेव्हा अन्य अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. कंपनीने त्यांची नावे खासगी आयुष्याचे कारण देत सरकारला दिली नाहीत. त्यांची तपासणी केली की नाही याचीही माहिती दिलेली नाही. तसेच बोस्टनच्या बैठकीवेळी कोरोना पसरण्याची माहिती नसल्याचेही कारण कंपनीने दिले आहे. याच काळात अनेक कंपन्यांच्या बैठका रद्द झाल्या होत्या. अमेरिकेमध्ये कोरोना पसरल्यापासून कंपनीने 14004 हजार डॉलरचा महसूल कमावला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प