शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

coronavirus: सदस्य देशांच्या दबावासमोर WHO झुकली, कोरोना विषाणूसंबधी तपासास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 08:17 IST

कोरोना विषाणूच्या झालेल्या प्रसारासाठी जगातील अनेक देशांनी चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. तसेच कोरोनावरून अमेरिका आणि चीन हे देश आमनेसामने आले आहेत.

ठळक मुद्दे चीनमध्ये सुरुवात होऊन संपूर्ण जगात पोहोचलेल्या कोरोना विषाणूमुळे जगातील अनेक देशात हाहाकार उडाला आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.आफ्रिकी आणि युरोपीय देशांसह अन्य देशांच्या संघटनेने कोरोनाच्या साथी संदर्भात सखोल मूल्यांकन करण्याची मागणी केली आहे.

जिनेव्हा - चीनमध्ये सुरुवात होऊन संपूर्ण जगात पोहोचलेल्या कोरोना विषाणूमुळे जगातील अनेक देशात हाहाकार उडाला आहे. तसेच कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावाबाबत स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जागतिक आरोग्य संघटनेच्या अनेक सदस्य देशांनी केली होती. अखेर या सदस्य देशांनी आणलेल्या दबावासमोर जागतिक आरोग्य संघटना झुकली असून, कोरोनासंबंधीच्या तपासास मान्यता दिली आहे.

कोरोना विषाणूच्या झालेल्या प्रसारासाठी जगातील अनेक देशांनी चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. तसेच कोरोनावरून अमेरिका आणि चीन हे देश आमनेसामने आले आहेत. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जागतिक अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.

आफ्रिकी आणि युरोपीय देशांसह अन्य देशांच्या संघटनेने कोरोनाच्या साथी संदर्भात सखोल मूल्यांकन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणू हा चीनमधील एका प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. तर हा विषाणू कुठल्यातरी प्राण्यामधून माणसांमध्ये पोहोचल्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोहळा दाखवून आवळा? आर्थिक पॅकेजवर सरकारच्या तिजोरीतून होणार केवळ एवढीच रक्कम खर्च

इस्राइलमधील राजकीय अनिश्चितता संपुष्टात, नेतान्याहू पुन्हा पंतप्रधानपदी, मोदींनी दिल्या शुभेच्छा 

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांना अटक, गुन्हा दाखल  

 दरम्यान, कोरोनाबाबत अनेक देशांनी डब्ल्यूएचओच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले. वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळी रणनीती आखली. त्यामुळे आपल्याला जबर किंमत मोजावी लागत आहे, असा दावा संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनिओ गुटारेस यांनी केला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे आलेल्या साथीबाबत एक स्वतंत्र तपास सुरू केला जाईल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना