शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मोठी बातमी! : 10 डॉलरपेक्षाही कमी किमतीत मिळणार रशियाची Sputnik V लस, जानेवारीमध्ये सुरू होणार डिलिव्हरी

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 24, 2020 18:14 IST

रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) मंगळवारी एक निवेदन जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

ठळक मुद्देरशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) मंगळवारी एक निवेदन जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. स्पुतनिक-5 च्या एका डोसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 10 डॉलरपेक्षाही कमी असणार आहे.जानेवारी महिन्यात सुरू होईल स्पुतनिक-5ची डिलिव्हरी.

मॉस्को : जगभरात कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढतच चालला आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष कोरोना लशीकडे लागले आहे. कुठल्या लशीची किंमत किती असेल? लस बाजारात केव्हा येईल? असे प्रश्न लोकांना पडले आहेत. अशातच रशियाच्या स्पुतनिक-5 लशीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. स्पुतनिक-5 च्या एका डोसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 10 डॉलरपेक्षाही कमी असणार आहे. तर, रशियन नागरिकांसाही ही लस मोफत असणार आहे. एका व्यक्तीला या लशीच्या दोन डोसची आवश्यकता असेल.

रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) मंगळवारी एक निवेदन जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ही लस गमालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर अॅपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी आणि रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) सोबत येऊन तयार केली आहे.

जानेवारी महिन्यात सुरू होईल डिलिव्हरी -स्पुतनिक-5 लशीची पहिली आंतरराष्ट्रीय डिलिव्हरी जानेवारी 2021मध्ये परदेशातील निर्मात्यांसोबत केलेल्या भागीदारीच्या आधारे ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. महत्वाची गोष्ट म्हणजे, क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या अंतरिम विश्लेषणानुसार, पहिला डोस दिल्याच्या 28 दिवसांनंतर SputnikV 91.4 टक्के प्रभावी ठरली आहे.

आरडीआयएफचे सीईओ किरील दिमित्रिव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलारूस, ब्राझील, यूएई आणि भारतात क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. याचे परिणाम वेगवेगळ्या देशांसाठी उपलब्ध होतील. ते म्हणाले, आम्ही जानेवारीपर्यंत माहिती उपलब्ध करण्यासंदर्भात बोलणी करत आहोत.

आतापर्यंत तीन लशी तयार केल्याचा रशियाचा दावा - रशियाने आतापर्यंत तीन कोरोना लशी तयार केल्याचा दावा केला आहे. त्यांनी ऑगस्ट महिन्यात आपली पहिली Sputnik V लस लॉन्च केली होती. खुद्द रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनीच 11 ऑगस्ट 2020 रोजी यासंदर्भात घोषणा केली होती. रशियाच्या या घोषणेनंतर जगातील सर्वच तज्ज्ञांना मोठा धक्का बसला होता.

या लशीच्या दोन ट्रायल याच वर्षी जून-जुलैमध्ये पूर्ण करण्यात आल्या होत्या. यात 76 स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. परिणाम स्वरूप 100 टक्के अँटीबॉडी विकसित झाल्या होत्या. यानंतर 14 ऑक्टोबरला दुसरी लस अॅपिव्हॅककोरोना (EpiVacCorona) आली होई आणि नुकताच रशियाने कोरोनाची तिसरी लस तयार केल्याचाही दावा केला आहे.

रशियाची तिसरी लस चुमाकोव्ह सेंटर ऑफ रशियन अॅकेडमी ऑफ सायन्सेसमध्ये तयार केली जात आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या इनअॅक्टिव्हेटेड लशीला डिसेंबर 2020पर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयmedicineऔषधंrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन