शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

Coronavirus : कोरोनामुळे उदभवलेल्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 05:49 IST

चीनमधील हुबेई प्रांत व वुहान शहरातून कोरोनाची साथ सर्वत्र पसरून त्यामुळे जगभरात ७९०० जणांचा बळी गेला तर आजवर सुमारे २ लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे.

पॅरिस : कोरोना विषाणूच्या साथीमुळे जागतिक स्तरावर अब्जावधी डॉलरचे नुकसान झाले असून, त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करण्यासाठी अमेरिका व ब्रिटनने अनेक उपाय योजले आहेत. या साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने अन्य देशांतील प्रवाशांना युरोपीय समुदायाने प्रवेशबंदी केली आहे.चीनमधील हुबेई प्रांत व वुहान शहरातून कोरोनाची साथ सर्वत्र पसरून त्यामुळे जगभरात ७९०० जणांचा बळी गेला तर आजवर सुमारे २ लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. कोरोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या संकटाचा हे दोन्ही देश योग्यरितीने मुकाबला करत नसल्याची टीका होत होती.या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांना तत्काळ रोख स्वरुपात मदत देण्यासह अन्य तरतुदींचा समावेश असलेले व्यय विधेयक संमत करण्याबाबत माझे सरकार प्रयत्नशील आहे.त्या देशातील कोरोनाग्रस्तांना ८५० अब्ज डॉलरची मदत करण्याचा विचार आहे. अमेरिकेतील सर्व ५० राज्यांमध्ये कोरोना साथीचा फैलाव झाला असून तिथे या साथीने बळी पडलेल्यांची संख्या १०५वर पोहोचली आहे.ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सांगितले की, कोरोनाच्या साथीमुळे अडचणीत आलेल्या ब्रिटनमधील उद्योगांना कर्जरुपाने ३३० अब्ज पौंडांची मदत देण्याचे तेथील सरकारने ठरविले आहे. तर फ्रान्सने ४५ अब्ज युरोची आर्थिक मदत देऊ केली आहे. अन्य देशांतील प्रवाशांना युरोपीय समुदायातील देशांमध्ये प्रवेशबंदी असून हा निर्बंध ३० दिवसांकरिता लागू असेल असे जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी सांगितले. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याकरिता बेल्जियमपासून युरोपीय समुदायातील अनेक देशांत ५ एप्रिलपर्यंत काही निर्बंध घालण्यात आले आहेत. काही देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. (वृत्तसंस्था)चीनमधील बळींची संख्या ३,२२६वरचीनमधील वुहानमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला असून, आणखी १३ रुग्ण या साथीमुळे मरण पावले आहेत. त्यामुळे चीनमध्ये कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या आता ३,२२६वर पोहोचली आहे.कोरोनाची साथ रोखण्यासाठी चीनने ३० हजार वैद्यकीय कर्मचारी तैनात केले आहेत. त्यामध्ये लष्करातील वैद्यकीय तज्ज्ञांचाही समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited StatesअमेरिकाEnglandइंग्लंड