शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: लसीकरणानंतरही अमेरिकेचं टेन्शन वाढलं; अति दक्षता विभाग कोरोना रुग्णांनी भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 07:40 IST

आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची टंचाई, सरकारी आकडेवारीनुुसार पूर्ण लसीकरण झालेली पाच राज्ये ही न्यू इंग्लंडमधील आहेत

वॉशिंग्टन : अमेरिकेत लसीकरणाचा सर्वोच्च वेग असूनही कोविड-१९ चा डेल्टा व्हेरिएंट किती घातक आहे याचा अनुभव न्यू इंग्लंड राज्यांच्या बहुतेक भागांत येत आहे. या भागातील अति दक्षता विभाग रुग्णांनी भरून गेले असून आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची टंचाई जाणवत आहे.  त्याचा परिणाम रुग्ण सेवेवर होतो आहे. ज्यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधक लस घेतली नाही त्यांनी ती लवकर घ्यावी, असे आवाहन अधिकारी करीत आहेत. 

“आमच्यासाठी हे सगळे निराशाजनक आहे”, असे व्हरमाँट डिपार्टमेंट ऑफ फिनान्शियल रेग्युलेशनचे आयुक्त मायकेल पिसियाक म्हणाले. पिसियाक यांच्याकडे राज्यातील कोविड-१९ च्या आकडेवारीवर लक्ष ठेवण्याचे काम आहे. शाळांमध्ये मुले सुरक्षित राहिली पाहिजेत, असे आम्हाला वाटते. न्यू इंग्लडच्या काही भागांत कोरोनाचे विक्रमी रुग्ण नोंदले जात आहेत. न्यू इंग्लंडमधील अधिकारी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होईल यासाठी खूप प्रयत्न करीत आहेत. ९० टक्क्यांच्या वर लसीकरण करण्याची गरज आहे, असे आराेग्य विभागाचे कार्यकारी संचालक टॉम मॅकार्थी म्हणाले.

न्यू इंग्लंडमध्ये काय आहे परिस्थिती?सरकारी आकडेवारीनुुसार पूर्ण लसीकरण झालेली पाच राज्ये ही न्यू इंग्लंडमधील आहेत. अमेरिकेत लसीकरणाची टक्केवारी उच्च असून देशाचे सरासरी लसीकरण ५५.५ टक्के आहे. न्यू इंग्लंडमध्ये हजारो लोक असे आहेत की, या ना त्या कारणाने त्यांनी लस घेतलेली नाही. ७० टक्के लसीकरण झाले तर महामारीला रोखण्यास पुरेसे आहे, असे ठासून सांगितले जात होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका