शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : तिने  बनवले  कर्णबधिरांसाठी खास  पारदर्शक  मास्क 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:10 IST

जी माणसं एरव्हीही बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, त्यांचं याकाळात काय झालं असेल? सगळ्यांनी कापडाचे मास्क चेह:यावर बांधले तर त्यांच्या ओठांच्या हालचाली वाचून ही माणसं संवाद कशी साधणार?

ठळक मुद्देकर्णबधीरांसाठी पारदर्शक मास्क

सगळ्या जगाला लॉकडाऊनची चिंता आहे, मात्र जी माणसं एरव्हीही बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, त्यांचं याकाळात काय झालं असेल?एरव्ही लीप रिडींग, फेस रिडींग करणारे, साइन लॅग्वेंजद्वारे बोलणारे, ऐकणारे त्यांचं या काळात का होत असेल?तोंडाला मास्क लावला तर ते बोलणार कसे? आणि त्यांच्यासोबत जे राहतात, त्यांनीही सगळ्यांनी कापडाचे मास्क चेह:यावर बांधले तर त्यांच्या ओठांच्या हालचाली वाचूनही माणसं संवाद कशी साधणार? लहान मुलं, विद्यार्थी, ऑनलाइन वर्गात सध्या शिकणारी ही मुलं सगळ्यांचाच हा प्रश्न आहे.त्यावर उत्तर शोधलं एका 21 वर्षीय तरुणीनं. ती वुडलॅण्ड काऊण्टीत राहते. स्वत: शिकतेय आणि कर्णबधीर आणि श्रवणशक्ती कमी असणा:या मुलांना शिकवतेही. सध्या ती ही घरीच आहे आणि ऑनलाइन क्लासेस घेतेय.ते क्लास सुरु करताना तिला प्रश्न पडला की, आपण तोंडाला मास्क लावला तर या मुलांशी संवाद कसा होणार? त्यांना कळणार कसं की आपण काय बोलतोय?तिनं तिच्या आईशी बोलून त्यावर तोडगा काढला. त्यांनी घरातल्या नव्या को:या बेडशिट्स घेतल्या आणि त्याचे मास्क शिवायला घेतले. पण मास्क लावायचा पण ओठ, हनुवटी दिसली पाहिजेअसा त्यांना पर्याय हवा होता.मग त्यांनी घरातलंच प्लास्टिकचं फॅब्रिक वापरलं. घरातल्या काही कामांसाठी त्यांनी ते आणलेलं होतं आणि योगायोगानं एक रोल शिल्क होता.मग त्यांनी बेडशिटचे मास्क, मध्ये पारदर्शक प्लास्टिक लावून शिवले.मात्र ते मास्क कानावर बांधण्याचाही प्रश्न होता. 

अनेक मुलं कानात श्रवणयंत्र लावतात. काहीजण अजून छोटी उपकरणं लावतात. त्यांना कानाभोवती मास्क नको म्हणून, मग त्यांनी डोक्यातून घालून गळ्याभोवती बांधता येईल असे मास्क बनवले.अॅशली सांगते, ‘ कर्णबधीर मुलांना चेह:यावरचे भाव, ओठांच्या हालचाली दिसणं फार महत्वाचं असतं. त्यामुळे जरा संवेदनशिल होऊन विचार केला तर कुणालाही हे सहज सुचलं असतं. आमच्या घरात पुरेसं सामान आहे, आम्ही शिवतो आहोत,वाटतो आहोत मास्क! संवाद थांबू नये एवढीच माझी इच्छा आहे.’तिच्या या मास्कची माहिती सोशल मीडीयामुळे अनेकांना समजली. आता अमेरिकेतल्या सहा राज्यांतून तिच्याकडे या मास्कची मागणी येते आहे. संकटकाळातही दुस:याचा विचार किती गोष्टी सोप्या करु शकतो, याचं हे पारदर्शक मास्क हे प्रतीक आहे.