शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनापासून दूर पळाले, पण तोच जवळ आला; पवित्र पाणी प्यायल्याने कोरोना झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 20:58 IST

Coronavirus चर्चमधलं पवित्र पाणी प्यायल्यानं ४६ जणांना कोरोनाची लागण

सेऊल: सध्या जगात सर्वत्र कोरोनाची दहशत पाहायला मिळतेय. आतापर्यंत ७ हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर जवळपास पावणे दोन लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. सगळ्यांनीच कोरोनाचा धसका घेतलाय. मात्र अद्याप यावर कोणतीही लस सापडलेली नाही. सध्या शास्त्रज्ञांकडून यावर संशोधन सुरूय. मात्र सध्या तरी त्यांच्या हाती यश आलेलं नाही. मात्र कोरोना पळवण्याचा दावा करत अनेक जण उपाय सुचवत आहेत आणि काही जण त्यावर विश्वासदेखील ठेवत आहेत. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये असाच एक प्रकार घडलाय. दक्षिण सेऊलमध्ये असलेल्या गेऑन्जी प्रांतात रिव्हर ऑफ ग्रेस कम्युनिटी चर्चमधल्या एका महिला कर्मचाऱ्यानं बाटलीच्या नोझलमधून (नळीसारखा ड्रॉपर) भाविकांच्या तोंडामध्ये मिठाचे पाणी टाकले. हे पवित्र पाणी असून त्यामुळे कोरोना होणार नाही, असा दावा संबंधित महिलेनं केला. भाविकांनीदेखील त्यावर विश्वास ठेवला. मात्र या पवित्र पाण्यामुळे ४६ जणांना कोरोनाची बाधा झाली. या वृत्ताला स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनीदेखील दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे या ४६ जणांमध्ये चर्चचे मुख्य धर्मोपदेशक आणि त्याच्या पत्नीचाही समावेश आहे.एक ते आठ मार्चदरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल  मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये महिला कर्मचारी भाविकांच्या तोंडात मिठाचं पाणी टाकत असल्याचं स्पष्ट दिसतंय. ‘त्या महिलेनं स्प्रेसाठी वापरली जाणारी बाटली वापरली होती. भाविकांच्या तोंडात पाणी टाकताना महिलेनं बाटलीचं नोझलच त्यांच्या तोंडात टाकलं. त्यामुळेच भाविकांना कोरोनाची बाधा झाली,’ अशी माहिती कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाच्या प्रमुखांनी दिली. चर्चमधील महिला कर्मचारी बाटलीतून देत असलेलं पाणी पवित्र असून त्यामुळे कोरोनाचा विषाणू मरेल, या श्रद्धेनं सर्व भाविक ते पाणी प्यायले, अशी माहिती कृती दलाच्या प्रमुखांनी दिली. यानंतर लगेचच चर्च बंद करण्यात आलं. याशिवाय चर्चमधील प्रार्थनेला उपस्थित राहिलेल्या सर्वांची तपासणीदेखील सुरू करण्यात आली. दक्षिण कोरियामध्ये आठ हजाराहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या