शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : Omicronची दहशत! 'या' देशात लागला 'क्रूर लॉकडाउन'! प्रेग्नेंट महिला-मुलही मेटल बॉक्समध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 18:31 IST

या क्वारंटाईन कॅम्पसमधून बाहेर पडलेल्या अनेकांनी त्यांचे वाईट अनुभव शेअर केले आहेत. या मेटल बॉक्समध्ये त्यांच्याकडे फारच कमी अन्न असायचे. त्यांना घर सोडून क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्यास भाग पाडले गेले. येथे बसेस भरून लोक आणले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराने संपूर्ण जगाची परिस्थिती बिघडवली आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चीनच्या (China) अनयांगसह अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दोन कोटींहून अधिक लोक कडक लॉकडाऊन नियमांत आहेत. चीनच्या 'झिरो कोविड पॉलिसी'अंतर्गत प्रचंड सतर्कता बाळगली जात आहे. या धोरणांतर्गत चीनने आपल्या लोकांवर अतिशय कडक निर्बंध लादले आहेत. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, चीनने मोठ्या प्रमाणावर क्वारंटाइन कॅम्पचे नेटवर्क तयार केले आहे. तेथे हजारो मेटल बॉक्स तयार करण्यात आले आहेत. यात प्रेग्नंट महिला, लहान मुलांसह अनेकांना आयसोलेट केले जाते. (Worlds strictest lockdown in China)

कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात वुहान आणि हुबेई प्रांताच्या इतर भागांना बंद केल्यानंतर, आतापर्यंतचा हा सर्वात कडक लॉकडाऊन आहे. सध्या, Shiyan मधील सुमारे 125 कोटी लोक आणि Yuzhou मधील 10 लाखहून अधिक लोक लॉकडाऊन अंतर्गत कैद आहेत. तर अनयांग शहरात 55 लाख लोक घरांमध्ये बंद आहेत.

चीनमध्ये 'झिरो कोविड पॉलिसी' अंतर्गत लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनचे वर्णन 'जगातील सर्वात कडक लॉकडाऊन', असे केले जात आहे. यात जनतेवर अत्यंत क्रूर निर्बंध लादण्यात आले आहेत.

लोकांना मेटलच्या बॉक्समध्ये ठेवले जाते...!संबंधित वृत्तानुसार, कोरोनाच्या भीतीमुळे लोकांना दोन आठवडे एका छोट्या मेटलच्या बॉक्ससारख्या असलेल्या खोलीत ठेवले जाते. सुविधांच्या नावाखाली तेथे केवळ बेड आणि शौचालयच देण्यात आले आहे. चिनी माध्यमांनी स्वतःच याचे फोटो प्रसिद्ध केले होते. यात Shijiazhuang प्रांतातील 108 एकरच्या क्वारंटाईन कॅम्पसमध्ये हजारो लोकांना कसे ठेवले आहे हे दाखवले आहे. हे कॅम्पस पहिल्यांदा जानेवारी 2021 मध्ये तयार करण्यात आले होते.

या क्वारंटाईन कॅम्पसमधून बाहेर पडलेल्या अनेकांनी त्यांचे वाईट अनुभव शेअर केले आहेत. या मेटल बॉक्समध्ये त्यांच्याकडे फारच कमी अन्न असायचे. त्यांना घर सोडून क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्यास भाग पाडले गेले. येथे बसेस भरून लोक आणले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

एका व्यक्तीने बीबीसीशी बोलताना सांगितले की, 'येथे काहीही नाही, केवळ मूलभूत गोष्टी आहेत... आम्हाला तपासण्यासाठी कुणीही आले नाही, हे कसले क्वारंटाइन सेंटर आहे? वृद्ध आणि लहान मुलांनाही येथे ठेवण्यात आले आहे. बाहेर निघाल्यानंतर मारले जाते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसchinaचीन