शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

coronavirus : उत्तर कोरियाचे बिंग फुटले, किम जोंग गुपचूप करतोय हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 09:35 IST

किम जोंग उनने हुकूमशाहीच्या पोलादी पडद्याखाली लपवून ठेवलेल्या अनेक गोष्टींचा आता उलगडा होऊ लागला आहे.

ठळक मुद्देकिम जोंग उनने हुकूमशाहीच्या पोलादी पडद्याखाली लपवून ठेवलेल्या अनेक गोष्टींचा आता उलगडा होऊ लागला आहे. उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण न आढळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. उत्तर कोरियात आरोग्य व्यवस्था कमकुवत आहे. त्यामुळे येथे कोरोना भयावह रूप घेण्याची शक्यता आहे.

- संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना चीनच्या सीमेला अगदी लागून असलेल्या उत्तर कोरियाने मात्र आपल्या देशात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचा दावा केला होता. मात्र उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण न आढळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. पण किम जोंग उनने हुकूमशाहीच्या पोलादी पडद्याखाली लपवून ठेवलेल्या अनेक गोष्टींचा आता उलगडा होऊ लागला आहे. 

नुकत्याच सामोर आलेल्या गोपनीय अहवालानुसार उत्तर कोरियाकडून देशात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा केला असला तरी पडद्यामागे मात्र कोरोनाचा सामना करण्यासाठी उत्तर कोरियाचे सरकार गोपनीयपणे इतर देशांकडे मदत मागत आहे. 'द फायनान्शिअल टाइम्स'ने दिलेल्या वृतानुसार उत्तर कोरियाचे अधिकारी गुप्तपणे इतर देशांच्या समकक्षांशी चर्चा करत आहेत. तसेच उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया आणि आंतरराष्ट्रीय संघटनांकडे मास्क आणि टेस्ट मशीन पाठवण्याची विनंती   केल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले होते. 

दरम्यान, उत्तर कोरियाने जानेवारी महिन्याच्या अखेरीस चीनला लागून असलेली आपली सीमा बंद केली होती. तसेच चीनमधून आलेल्या आपल्या देशाच्या 590 नागरिकांची तपासणी केली होती. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. 

दुसरीकडे उत्तर कोरियात कोरोनामुळे अनेकजणांचा मृत्यू झाला असून, ही बाब ते जगापासून लपवत असल्याचा दावा दक्षिण कोरियातील अनेक प्रसारमाध्यमांनी केला होता. जानेवारी आणि फेब्रुवारीदरम्यान उत्तर कोरियात कोरोनामुळे 180 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे तसेच 3700 सैनिकांचे विलगिकरण करण्यात आल्याचे उत्तर कोरियावर प्राधान्याने बातम्या देणाऱ्या डेली एनकेने म्हटले आहे. तसेच उत्तर कोरियाच्या चीनला लागून असलेल्या सिनुइयू प्रांतात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे डेली एनकेने म्हटले आहे. उत्तर कोरियात आरोग्य व्यवस्था कमकुवत आहे. त्यामुळे येथे कोरोना भयावह रूप घेण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयnorth koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उन