शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : स्पेनच्या या शहरात कोरोना हरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:31 IST

स्वत:ला जगापासून तोडणाऱ्या  स्पेनमधल्या एका शहराची गोष्ट.

ठळक मुद्दे या शहरातं मात्र एकाही व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली नाही.

साऱ्या  देशाला कोरोनानं विळखा घातला. त्यातून दहा हजार लोक दगावले.मात्र स्पेनमधल्या जहारा डे ला सिएरा या शहरातं मात्र एकाही व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली नाही. सगळी माणसं सुरक्षित आहेत. साऱ्या  स्पेनमध्ये हाहाकार असताना या शहराला असं सुरक्षित राहणं कसं जमलं?त्याचं उत्तर आहे, त्या शहरात 40 वर्षाचा महापौर. सॅण्टिगो गॅलवन. ज्यादिवशी स्पेनमध्ये ‘स्टेट ऑफ अलार्म’ अर्थात लॉकडाऊन जाहीर झालं. त्याक्षणी या तरुण महापौरानं आपल्या शहरात येणारे पाचही रस्ते बंद केले. दक्षिण स्पेनमधलं हे शहर. या शहराला मध्ययुगापासून लढायांचा, लढवय्यांचा मोठा वारसा आहे. त्याच वृत्तीनं इथली माणसं कोरोनाशी दोन हात करायला तयार झाली.पूर्ण शहर बंद झालं. रस्त्यावर कुठलंच वाहन उतरलं नाही. जे जर्मन आणि फ्रेंच टुरिस्ट होते, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.  शहरात येणारी प्रत्येक गाडी र्निजतूक करुन, वेशीवरच माणसांची चाचणी करुन त्यांना आत सोडण्यात आलं. या शहरानं आपला बाकी जगाशी आणि स्पेनशीही असलेला सारा संपर्कच तोडून टाकला. आपण असा संपर्क तोडतोय त्यानं अडचणी येतील याची माहिती महापौरानं लोकांना दिली. मात्र 1400 लोकवस्तीचं हे शहर त्याच्यामागे उभं राहिलं.

आता रस्त्यावर माणसं नको म्हणून आवश्यक त्या वस्तू, किराणा घरपोच दिल्या जातात. कुणीच रस्त्यावर येत नाही. त्याचा परिणाम असा झाला की, या शहरात कुणीही बाधित नाही. आज सारे सुरक्षित आहेत, मात्र त्याचं श्रेय लोकांनाही की ते महापौरानं सांगितलं त्या क्षणापासून घरातच बसून आहेत. दोन आठवडे झाले, अजून त्यांचा संयम संपलेला नाही.