शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : वन्यप्राण्यांच्या भक्षणावर चीनच्या वुहानमध्ये बंदी; खवय्यांच्या यादीतून सिंह, वाघ, मोर, खवले मांजर होणार गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 02:06 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरातील एका प्राणी बाजारातून कोरोना विषाणूचा माणसाला संसर्ग झाल्याचे सांगण्यात येते. वटवाघळातून हा विषाणू माणसामध्ये शिरला असेही मानले जाते.

वुहान : जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा उगम जिथून झाला त्या चीनमधील वुहान शहरात आता वन्यप्राण्यांचे भक्षण करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे सिंह, वाघ, मोर, खवले मांजर असे अनेक वन्यप्राणी आता चिनी खवय्यांच्या यादीतून कटाप होणार आहेत.चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरातील एका प्राणी बाजारातून कोरोना विषाणूचा माणसाला संसर्ग झाल्याचे सांगण्यात येते. वटवाघळातून हा विषाणू माणसामध्ये शिरला असेही मानले जाते. मात्र कोरोना विषाणू चीनने वुहानमधील प्रयोगशाळेत निर्माण केला असून, त्याचे ठोस पुरावे आमच्या हाती लागले आहेत, असा दावा अमेरिकेच्या काही नेत्यांनी केला होता. हा आरोप चीनने नाकारला असून त्या देशाची अमेरिकेशी सध्या कोरोना साथीच्या मुद्द्यावरून रोज खडाजंगी सुरू असते. कोरोनाच्या साथीबाबत खरी माहिती चीनने दडवून ठेवली व त्यामुळे त्याचे अतिशय भीषण परिणाम जगाला भोगावे लागले, असा आरोप अमेरिकेसह युरोपीय देशांनी केला होता.वुहानमधून कोरोनाची साथ कशी पसरली याची आता जागतिक स्तरावरील अनेक देश संयुक्त चौकशी करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सावध झालेल्या चीनने काही दिवसांपूर्वी वुहानमधील प्राणी बाजार बंद केला व आता तेथील नागरिकांना वन्यप्राणी खाण्यास बंदी केली आहे. अनेक वन्यप्राण्यांचा संकर घडवून त्यांची विक्री करण्याचा उद्योग चीनमधील अनेक शेतकरी करतात. त्यांनी हा उद्योग बंद करावा असा आदेश आता चीन सरकारने दिला आहे. या शेतकऱ्यांना चीन सरकारकडून नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.हुनान व जिआंगक्सी या दोन प्रांतांमध्ये अशा शेतकºयांची संख्या अधिक आहे. वन्यप्राण्यांचा संकर घडवून त्यांची विक्री खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्याकरिता केली जात असे. त्या व्यवसायातून दरवर्षी १० अब्ज युआनची आर्थिक उलाढाल होते. आता बंदीमुळे या सर्व व्यवहारांवरच गदा आली आहे.

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या