शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

CoronaVirus News: संक्रमितांमधील नवी लक्षणे आली समोर, संसर्ग झाल्यास तीन दिवसांनंतर नष्ट होते 'ही' क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 19:15 IST

हे लक्षण समजणे अत्यंत मोठी गोष्ट आहे. यामुळे संबंधित व्यक्ती संक्रमाणाच्या पहिल्याच आठवड्यात आहे, हे कळू शकते. तसेच, पुढील एक अथवा दोन आठवडे त्याच्या उपचारासाठी मिळू शकतात.

ठळक मुद्देस्वीत्झर्लंडमधील कॅन्टोंसपिट ऑरो रुग्णालयात कोरोनाच्या 103 रुग्णांवर सहा आठवडे अभ्यास केल्यानंतर, ही बाब समोर आली आहेसीडीसीने ही लक्षणे आपल्या अधिकृत यादीतही समाविष्ट केली आहेतएखाद्या गोष्टीचा वास घेण्याची क्षमता नष्ट होण्याचा इतर लक्षणांशीही थेट संबंध

न्यू यॉर्क : कोरोना व्हायरसची नव-नवीन लक्षणे सातत्याने समोर येत आहेत. सिनसिनाटी युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनानुसार, कोरोनाचा संसर्ग झाला, की तीन दिवसांनंतर रुग्णांची एखाद्या गोष्टीचा वास घेण्याची क्षणता नष्ट होते. एवढेच नाही, तर अनेक रुग्णांच्या स्वाद ओळखण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाल्याचे समोर आले आहे. या संशोधनात तरूण आणि महिला रुग्णांमध्ये ही लक्षणे अधिक प्रमाणात दिसून आली.

स्वीत्झर्लंडमधील कॅन्टोंसपिट ऑरो रुग्णालयात कोरोनाच्या 103 रुग्णांवर सहा आठवडे अभ्यास केल्यानंतर, ही बाब समोर आली आहे. या कोरोनाबाधित रुग्णांना विचारण्यात आले, की त्यांच्यात किती दिवसांपासून लक्षणे आहेत? तसेच, लक्षणांचे टायमिंग आणि गंभीरता यासंदर्भातही प्रश्न विचारण्यात आले. 

आणखी वाचा - CoronaVirus News : दीड महिन्यानंतर येऊ शकतं कोरोनावरील स्वस्त औषध, DGCIनं दिली 'क्लिनिकल ट्रायल'ची परवानगी

यापूर्वी अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननेही (सीडीसी) कोरोनामुळे चव आणि एखाद्या गोष्टीचा वास घेण्याची क्षमता नष्ट होते, असे म्हटले होते. सीडीसीने ही लक्षणे आपल्या अधिकृत यादीतही समाविष्ट केली आहेत. 

एखाद्या गोष्टीचा वास घेण्याची क्षमता नष्ट होण्याचा इतर लक्षणांशीही थेट संबंध -सिनसिनाटी युनिव्हर्सिटीच्या यूसी कॉलेज ऑफ मेडिसिन डिपार्टमेंटच्या ऑटोलरीन्गोलॉजी सर्जरीचे असोसिएट प्रोफेसर अहमद सेदाघाट यांच्या मते, कोरोना संसर्गामुळे अॅनोस्मिया (एखाद्या गोष्टीचा वास घेण्याच्या क्षमतेत कमी) होने अत्यंत घातक आहे. याचा संबंध थेट रुग्णांमध्ये समोर येणाऱ्या इतर लक्षणांशी आहे. एस्नोमियाची  लक्षणे अधिक असतील तर रुग्णांत खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि तापेचे प्रमाणही अधिक असेल.

आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका

नव्या लक्षणांची माहिती होणे कोरोनावरील उपचारासाठी महत्वाचे -सेदाघाट यांच्या मते, या संशोधनात जवळपास 61 टक्के रुग्णांनी वास घेण्याची क्षमता नष्ट झाल्याचे मान्य केले. यांच्यातील ही क्षमता नष्ट होण्याचा कालावधी 3 दिवस 4 तास, एवढा असल्याचे समोर आले आहे. संशोधकांच्या मते हे लक्षण समजणे अत्यंत मोठी गोष्ट आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीत कोरोना संसर्गासोबतच वास घेण्याची क्षमता कमी असेल, तर हे कळू शकते, की संबंधित व्यक्ती संक्रमाणाच्या पहिल्याच आठवड्यात आहे. यामुळे, पुढील एक अथवा दोन आठवडे त्याच्या उपचारासाठी मिळू शकतात. मात्र, हा केवळ आजाराचा एक संकेत आहे, याला पूर्ण कारण मानले जाऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा - 'औरंगजेबा'ने बनवले होते मुस्लीम, तब्बल 40 कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात केला प्रवेश

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरSwitzerlandस्वित्झर्लंडAmericaअमेरिका