शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचा जन्म कसा झाला? वैज्ञानिकांना सापडला महत्त्वाचा पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 22:29 IST

CoronaVirus News: कोरोनाची उत्पत्ती नेमकी कशी झाली?; लॅन्सेटमध्ये शास्त्रज्ञांचा लेख

नवी दिल्ली: चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. वुहानमधूनच कोरोनाचा विषाणू जगभरात पसरला. कोरोनाचा जन्म झाला कसा, असा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे. यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. कोरोनाच्या उगमावरून संपूर्ण जग चीनकडे संशयानं पाहत आहे. मात्र अद्याप तरी शास्त्रज्ञांना याबद्दलचे ठोस पुरावे सापडलेले नाहीत. कोरोना विषाणूची उत्पत्ती नैसर्गिक असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे.

चीनच्या एका प्रयोगशाळेत कोरोनाचा विषाणू तयार करण्यात आला आणि तिथून तो वातावरणात पसरला याची साक्ष देणारे कोणतेही शास्त्रीय पुरावे उपलब्ध नसल्याचं शास्त्रज्ञांच्या एका गटानं लॅन्सेट नियतकालिकेतील लेखात म्हटलं आहे. सोमवारी हा अहवाल प्रसिद्ध झाला. जगभरातील दोन डझन जीवतज्ज्ञ, महामारी तज्ज्ञ, डॉक्टर, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि प्राण्यांचे डॉक्टर यांनी मिळून हा अहवाल तयार केला आहे.

शास्त्रज्ञांचं म्हणणं काय?कोरोना विषाणूची निर्मिती निसर्गातच झाल्याचे ठोस पुरावे संशोधनातून मिळाले आहेत. कोरोना विषाणूची निर्मिती एका प्रयोगशाळेत करण्यात आली, याबद्दल कोणतेही पुरावे आढळून आलेले नाहीत, असं लेखकांनी नियतकालिकेतील लेखात नमूद केलं आहे. शास्त्रज्ञांच्या याच गटानं गेल्या वर्षीदेखील लॅन्सेटसाठी लेख लिहिला होता. त्यातही त्यांनी प्रयोगशाळेतून विषाणू बाहेर पडल्याची शक्यता फेटाळून लावली होती. कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी अधिक संशोधन करण्याची मागणी जगभरातून होत असताना हा अहवाल समोर आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या