शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

CoronaVirus News: खूशखबर! फायझरची लस ९०% प्रभावी; लवकरच विक्रीला मंजुरी?

By कुणाल गवाणकर | Updated: November 9, 2020 21:34 IST

CoronaVirus Vaccine News: फायझरची कोरोना लस तिसऱ्या टप्प्यात; लवकरच विक्रीला परवानगी मिळण्याची शक्यता

वॉशिंग्टन: अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. युरोपातल्या अनेक देशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या परिस्थितीत आता आशेचा एक किरण दिसू लागला आहे. फायझर कंपनीची कोरोना लस नुकत्याच झालेल्या चाचणीत ९० टक्के यशस्वी ठरली आहे. पुढील काही चाचण्या व्यवस्थित पार पडल्यास आणि सर्व परवानग्या वेळेत मिळाल्यास फायझरला याच महिन्याच्या अखेरपर्यंत लस विक्रीची परवानगी मिळू शकते.फायझर औषध क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. अमेरिकेत मुख्यालय असलेली फायझर बायोएनटेक या जर्मन कंपनीसोबत कोरोनावरील लस तयार करत आहे. तिसऱ्या टप्प्यात लसीची ९४ कोरोना रुग्णांवर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ९० टक्के रुग्णांवर लसीचा सकारात्मक परिणाम दिसल्याची माहिती फायझरनं दिली आहे. लसीची चाचणी करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचं किमान एक लक्षण होतं.फायझरच्या लसीची चाचणी अद्याप संपलेली नाही. मात्र ही लस तिसऱ्या टप्प्यात ९० टक्के यशस्वी ठरल्यानं अपेक्षा उंचावल्या आहेत. बहुतांश रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसल्यानं फायझरची लस लवकरच बाजारात दाखल होऊ शकते. कोरोनामुळे आतापर्यंत जगात १२ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये आता कोरोनाची दुसरी लाट आल्यानं धोका अधिक वाढला आहे.कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीच्या निष्कर्षांची माहिती आज फायझरनं दिली. 'ज्या स्वयंसेवकांवर लसीची चाचणी घेण्यात आली, त्यातल्या ९० टक्के स्वयंसेवकांच्या शरीरातला कोरोना विषाणू रोखण्यात लसीला यश आलं. आणखी काही चाचण्यांमधूनही असेच निष्कर्ष हाती आल्यास लस सुरक्षित असल्याचं सिद्ध होईल. त्यानंतर कंपनी आरोग्य नियमकांकडे लस विकण्यासाठी अर्ज करेल,' असं कंपनीनं सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या