शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचे मृत्यू अधिकृत आकडेवारीपेक्षा जास्त; नेचर नियतकालिकात संशोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 06:09 IST

कोरोनामुळे जगात आजवर ५५ लाख ८४ हजार जण मरण पावल्याची अधिकृत आकडेवारी आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोनामुळे झालेले मृत्यू हे अधिकृत आकडेवारीपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहेत, असा दावा नेचर या नियकालिकातील एका लेखात करण्यात आला आहे. कोरोनामुळे जगात आजवर ५५ लाख ८४ हजार जण मरण पावल्याची अधिकृत आकडेवारी आहे.काही देशांतील कोरोना रुग्णांसंदर्भातील व त्यांच्या मृत्यूची आकडेवारी सदोष आहे. सुमारे १०० देशांमध्ये कोरोना रुग्णांची माहिती योग्य पद्धतीने गोळा केली जात नाही. नेदरलँँड या देशात कोरोना चाचणी झालेले व त्यानंतर रुग्णालयात मरण पावलेल्या लोकांचीच मृत्यूविषयक यादीत नोंद केली जाते. बेल्जियममध्ये कोरोनासदृश लक्षणे असलेल्या, पण चाचणी न झालेल्यांपैकी जे मरण पावले त्यांचाही मृतांच्या आकडेवारीत समावेश करण्यात आला आहे.नेचरमधील लेखात म्हटले आहे की, कोरोनाची साथ २०१९ मध्ये सुरू झाली. त्यानंतर आजपर्यंत कोरोनामुळे मरण पावलेल्यांचे प्रमाण अधिकृत आकडेवारीपेक्षा कदाचित दोन ते चार पट अधिक असावे. कोरोना विषाणूसोबत जगायला शिका : ब्रिटनचे आरोग्यमंत्रीकोरोनाच्या विषाणूसोबत आता जगायला शिकले पाहिजे, असे ब्रिटनचे आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, कोरोनाचा विषाणू यापुढे कायम आपल्यासोबत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याची गरज भासू शकते. ब्रिटनमधील शाळा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, दुकानांमध्ये मास्क घालण्याचा असलेला नियम पुढील आठवड्यापासून रद्द करण्याची घोषणा साजिद जाविद यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या