शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचा कहर; पुन्हा का वाढताेय?; अमेरिका चिंतेत, डेल्टा ठरताेय डाेकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 06:22 IST

गेल्या काही दिवसांत अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने बायडेन प्रशासन चिंतित झाले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क : कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाला वेग देणाऱ्या अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना हातपाय पसरू लागला असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने बायडेन प्रशासन चिंतित झाले आहे. काय आहे सद्य:स्थिती?अमेरिकेत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. येत्या चार आठवड्यांत अमेरिकेच्या विविध भागांत कोरोनामुळे रुग्णालयात भरती होण्याचे बाधितांचे प्रमाण वाढू शकते, अशी भीती सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) यांनी व्यक्त केली आहे. याच कालावधीत मृत्युदरातही वाढ होऊ शकते, अशी भीतीही सीडीसीने वर्तवली आहे. पाकिस्तानात चौथी लाट?पाकिस्तानात एकाच दिवसात १०२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानात आतापर्यंत ५००० बाधित आढळू आले असून कोरोनाची चौथी लाट सुरू झाल्याचे मानले जात आहे.काय असेल स्थिती?४ सप्टेंबरपर्यंत ३३०० ते १२,६०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो.५ लाख ते २३,४०,००० पर्यंत नवे कोरोनाबाधित सापडू शकतील. या चार आठवड्यांमध्ये अमेरिकी रुग्णालयांमध्ये ८,६०० ते ३३,३०० बाधितांना भरती करावे लागण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या दोन लाटांचा सामना कराव्या लागलेल्या अमेरिकेत आतापर्यंत ६,३०,००० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  चीनही अस्वस्थचीनमध्येही सध्या कोरोनाचे बाधित पुन्हा आढळून येऊ लागले आहेत.अलीकडेच वुहानमध्ये कोरोनाची लक्षणे असलेले काही रुग्ण सापडल्याने चीन सरकार अस्वस्थ झाले आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याच्या बातम्या चीनच्या सुदूर प्रांतातूनही येऊ लागल्या आहेत. रशियातही वाढले बाधितरशियात कोरोनाची तिसरी लाट अवतरली आहे. तिथे एकाच दिवसात ८०८ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद असून आतापर्यंत २२,००० नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका