शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थिती गंभीर! कोरोनामुळे शांघाईमध्ये नाकाबंदी; अपार्टमेंटकडे जाणारे रस्ते केले सील, लोकांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 17:53 IST

CoronaVirus News : शांघाई शहरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि छोट्या रस्त्यावर आणि अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश रोखण्यासाठी स्वयंसेवक आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी मेटल बॅरिअर्स लावले आहेत.

चीनच्या शांघाईमध्ये सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे. शांघाईमध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. इतर देशांच्या तुलनेत कोरोना संसर्गाची फारच कमी प्रकरणे समोर येत असली, तरी चिनी अधिकाऱ्यांनी एक प्रकारे शांघाईला रोखून धरलं आहे. अपार्टमेंटमधील लोकांची ये-जा थांबावी म्हणून अपार्टमेंटकडे जाणारा मुख्य रस्ताही सील करण्यात आला आहे. अपार्टमेंटमध्ये बंद असलेल्या लोकांना खाण्यापिण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना त्यांच्या घरात कैद केले आहे आणि कोरोनाचा संसर्ग शून्य करण्याचे धोरण स्वीकारण्यासाठी रस्त्यांवर बॅरिअर्स लावण्यात आले आहेत.

रिपोर्टनुसार, शांघाई शहरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि छोट्या रस्त्यावर आणि अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश रोखण्यासाठी स्वयंसेवक आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी मेटल बॅरिअर्स लावले आहेत. या संदर्भात, चीनी मीडिया संस्था Caixin ने सांगितले की, पुडोंग येथील स्थानिक प्रशासनाने धातूचे पत्रे किंवा अडथळे लावले आहेत. त्यात म्हटले आहे की ज्या इमारतींमध्ये संसर्गाची प्रकरणे आढळली आहेत त्या इमारतींचे मुख्य प्रवेशद्वार सील करण्यात आले आहे आणि केवळ आरोग्य कर्मचार्‍यांनाच जाण्याची परवानगी आहे. रविवारी, चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 21,796 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी बहुतेक शांघाईमधील आहेत आणि त्यांच्यात रोगाची लक्षणे नाहीत. 

देशभरातील अनेक शहरे आणि प्रांतांनी व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी काही प्रकारचे लॉकडाउन लागू केले आहेत. शांघाईमध्ये अनेक दिवसांपासून लॉकडाऊन आहे. एका दिवसात कुटुंबातून फक्त एका व्यक्तीला जाण्याची परवानगी आहे. विनापरवाना कोणतेही वाहन रस्त्यावरून जाऊ दिले जात नाही. सोशल मीडियावर मूलभूत गोष्टींचा अभाव असल्याच्या तक्रारी लोक करत आहेत, लोक संताप व्यक्त करत आहेत. पण चिनी प्रशासनावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. सर्वांना अपार्टमेंटमध्ये बंद करण्यात आले आहे. 

एका व्हिडीओमध्ये असे दिसते की आरोग्य कर्मचारी अपार्टमेंटला घेराव घालत आहेत. अधिकारी म्हणतात की जोपर्यंत शांघाईमध्ये नवीन प्रकरणे येत राहतात, तोपर्यंत निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता येणार नाही. क्वारंटाइन क्षेत्राबाहेर आढळून आलेला संसर्ग चिनी अधिकारी गांभीर्याने घेत आहेत आणि त्यासाठी संपूर्ण अपार्टमेंटला शिक्षा दिली जात आहे. रायटरच्या रिपोर्टनुसार, शनिवारी शांघाईमध्ये कोरोनामुळे 23 मृत्यू झाले आहेत. तर एक दिवस आधी शुक्रवारी 12 जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी, शांघाईमध्ये लक्षणे नसलेले 19657 नवीन रुग्ण आढळले, तर लक्षणे असलेल्या नवीन रुग्णांची संख्या 1401 आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन