शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : धक्कादायक! पतीनं लपवली कोरोनाची लक्षणं; गर्भवती पत्नीसुद्धा झाली संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 19:07 IST

जगभरातून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय आहे.

न्यूयॉर्कः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून, संक्रमितांची संख्यासुद्धा वाढली आहे. त्यामुळे जगभरातून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय आहे. लॉकडाऊन असतानाही बऱ्याचदा लोक बाहेर फिरताना दिसत आहेत. कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतरही काही जण डॉक्टरकडे जात नाहीत. अशा गोष्टी ते लपवण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. पत्नी गर्भवती असतानाही पतीनं कोरोनाबाधित असल्याची माहिती लपवली, त्यामुळे पत्नीसुद्धा आता कोरोनानं संक्रमित झाली आहे.usatoday.comच्या रिपोर्टनुसार, न्यूयॉर्कमध्ये हे प्रकरण उघडकीस आलं आहे. पत्नी प्रसूतिगृहात होती अन् पती तिला भेटण्यासाठी आला होता. प्रसूतीनंतर पत्नीची तपासणी केली असता तिच्यात कोरोनाची लक्षणं आढळली. न्यूयॉर्कच्या स्ट्राँग मेमोरिअल रुग्णालयात हा प्रकार घडला असून, रुग्णालय प्रशासन आता खडबडून जागं झालं आहे. त्यामुळे आता रुग्णालयात येणाऱ्या व्हिजिटर्सची स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. व्हिजिटर्सला आता रुग्णालयात प्रवेश करण्यापूर्वी सर्जिकल मास्क घालावं लागणार आहे. पत्नीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानंतर पतीनं स्वतः कोरोनाबाधित असल्याचं सांगितलं आहे. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावरही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.रुग्णालयातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, मुलाच्या जन्माच्या काही वेळानंतर आईमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागली. त्याचदरम्यान पतीनंसुद्धा त्याला कोरोनाची लक्षणं असल्याचं सांगितलं. रुग्णालय प्रशासनानं अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. अमेरिकेत बुधवारी कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा 4,000 वर जाऊन पोहोचला. अमेरिकेतील मृतांचा हा आकडा 9/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकड्यापेक्षाही मोठा आहे. अमेरिकेतील आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनामुळे तेथे तब्बल 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. जॉन्‍स हॉपकिन्‍स यूनिवर्सिटी कोरोना वायरस रिसोर्स सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 190,000 लोक संक्रमित झाले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका