शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

CoronaVirus Live Updates : बापरे! एका वर्षात तब्बल 4 वेळा कोरोना पॉझिटिव्ह झाली तरुणी; दरवेळी दिसली 'अशी' लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 15:32 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: एका वर्षात तरुणीला तब्बल चार वेळा कोरोनाची लागण झाली आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 35 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 359,575,171 वर पोहोचली आहे. तर 5,635,704 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर देखील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. आधी डेल्टा आणि आता ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीला एकदा, दोनदा नव्हे तर चार वेळा कोरोनाने गाठलं आहे.

एका वर्षात तरुणीला तब्बल चार वेळा कोरोनाची लागण झाली आहे. chinapress.com च्या रिपोर्टनुसार यूकेमध्ये राहणाऱ्या व्हार्टनला  (Wharton) सप्टेंबर 2020 मध्ये कोरोना झाला होता. त्यावेळी ती नोकरी करत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी फेस मास्क असायचा तरी कोरोनाने तिला आपल्या विळख्यात घेतलं. तिला सर्दी झाली होती. नाकातून सतत पाणी यायचं. त्यावेळी तिला होम क्वारंटाईन करण्यात आलं आणि काही दिवसांनी तिने कोरोनावर मात केली. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. 

जानेवारी 2021 मध्ये व्हार्टनचे पालक कोरोना पॉझिटिव्ह झाले. दोघंही वेगवेगळ्या रूममध्ये होते. तेव्हा व्हार्टनचीही कोरोना चाचणी करण्यात आली, ती पुन्हा पॉझिटिव्ह आढळली. यावेळी तिला ताप नव्हता पण तिचं नाक गळत होतं. यावेळीही तिने कोरोनाविरोधातील लढा जिंकला. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह येऊन एक महिनाही झाला नाही ती तिसऱ्यांदा कोरोनाच्या विळख्यात सापडली. अमेरिकेला जात असताना तिची टेस्ट करण्यात आली तेव्हा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. यावेळी तिला साधा सर्दी-खोकला होता.

तीन वेळा कोरोना होऊन गेल्यानंतर व्हार्टनने कोरोना लस घेतली. लशीचे दोन्ही डोस घेतले. आता ती आपल्या बुस्टर डोसची प्रतीक्षा करत होती तर तिला पुन्हा म्हणजे चौथ्यांदा कोरोना झाल्याचं निदान झालं. यावेळीही तिला होम क्वारंटाईन करण्यात आलं. पण यावेळी तिच्यामध्ये कोणतीच लक्षणं नाहीत. पण एका वर्षातच चार वेळा कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने लोकही हैराण झाले आहेत. व्हार्टन म्हणाली, कदाचित यावेळी व्हायरस कमजोर झाला असावा. तिच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत गेली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या