शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! चीनमध्ये संसर्ग रोखण्यासाठी 'अशा' केल्या जाताहेत टेस्ट; रुग्णांनी वाढवली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 13:47 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 52 कोटींचा टप्पा पार केला असून जगभरातील एकूण रुग्णांची संख्या 521,349,566 वर पोहोचली आहे. तर 6,288,525 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर आतापर्यंत 491,919,504 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. याच दरम्यान चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 

चीन सोमवार ते बुधवार या कालावधीत 12 जिल्ह्यांमध्ये तीन अतिरिक्त सामूहिक न्यूक्लिक अ‍ॅसिड चाचण्या आयोजित करेल. चीनच्या राजधानीत कोविड-19 संसर्गाची नवीन प्रकरणे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. हे 12 जिल्हे म्हणजे डोंगचेंग, जिचेंग, चाओयांग, हैडियान, फेंगटाई, शिजिंगशान, फांगशान, टोंगझोउ, शुनी, चांगपिंग, डॅक्सिंग आणि बीजिंग आर्थिक-तंत्रज्ञान विकास क्षेत्र आहेत. 

12 जिल्ह्यांमध्ये झाल्या चाचण्या 

सिन्हुआ वृत्तसंस्थेने बीजिंग नगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलं आहे की, आरोग्य आयोगाच्या ताज्या हालचालीमध्ये 13 ते 15 मे या कालावधीत 12 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये मेंटौगौ, पिंग्गु, हुआरौ, मियुन आणि यानकिंग येथील रहिवाशांना नियमित न्यूक्लिक अ‍ॅसिड चाचणी करणे आवश्यक आहे.

वांग म्हणाले, 13-15 मे या कालावधीत मोठ्या प्रमाणावर चाचणी करताना आरोग्य अधिकाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक आणि कुरिअर क्षेत्रे तसेच बांधकाम साइटसह प्रमुख उद्योग आणि अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग आढळून आला आहे. बीजिंग म्युनिसिपल सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोलचे डेप्युटी हेड पांग जिंगहुओ यांनी मीडियाला सांगितले की, बीजिंगमध्ये शनिवारी दुपारी 3 ते रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 55 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या