शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : सिंगल डोस लस डेल्टासह प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी, जॉन्सन अँड जॉन्सनचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 09:49 IST

Coronavirus : सिंगल डोस लस गंभीर किंवा अत्यंत गंभीर आजाराच्या विरूद्ध 85% प्रभावी असल्याचे आढळले आहे.

वॉशिंग्टन : कोरोनाविरोधातील सिंगल डोस व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी असल्याचा दावा अमेरिकेतील फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने (Johnson & Johnson) केला आहे. सिंगल डोस लस गंभीर किंवा अत्यंत गंभीर आजाराच्या विरूद्ध 85% प्रभावी असल्याचे आढळले आहे.

कंपनीने असा दावा केला आहे की, लोकांना रुग्णालयात दाखल होण्यापासून आणि मृत्यूपासून वाचवले. लस घेतलेल्या 8 लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांमधून हे उघडकीस आले आहे की, ही लस डेल्टासह सर्व प्रकारच्या व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहे. जॉन्सन अँड जॉन्सनचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी पॉल स्टॉफल्स म्हणाले, "आज जाहीर केलेल्या स्टडीनुसार जॉन्सन अँड जॉन्सनची लस जगभरातील लोकांचे जीवन वाचविण्यात मदत करते."

लसीच्या पहिल्या डोसच्या 29 दिवसांत डेल्टा व्हेरियंटवर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलसह या लसीचा प्रभाव जागतिक स्तरावर सारखाच असल्याचे कंपनीने म्हटले होते. स्टडीदरम्यान, या भागांमध्ये बीटा आणि जीटा व्हेरिएंटचे प्रमाण अधिक आढळले होते. जॉन्सन अँड जॉन्सनचे आणखी एक अधिकारी जोहान वान हूफ यांनी सांगितले की, "आम्ही खूप आनंदी आहोत. आम्हाला खात्री आहे की या लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता नाही आणि ती सर्व व्हेरिएंटवर प्रभावी आहे."

कमीत कमी एक वर्षापर्यंत बूस्टर डोसची गरज नाही - कंपनीसध्याच्या आकडेवारीच्या आधारे जोहान वान हूफ म्हणाले की, कंपनीला असा विश्वास आहे की ज्या लोकांना ही लस दिली गेली आहे त्यांना एका वर्षाच्या आत बूस्टर डोसची गरज भासणार नाही. जर गरज वाटली तरी सुद्धा फॉर्मूलेशन बदलावा लागेल असे आम्हाला वाटत नाही.

दरम्यान, भारत सरकार सुद्धा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीसोबत लसींच्या मुद्द्यावर चर्चा करत आहे. अलीकडेच जॉन्सन अँड जॉन्सनच्या भारतीय युनिटच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्था 'एएनआय'ला सांगितले होते की, 'डीसीजीआयने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार, आता भारतात अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे क्लिनिकल स्टडीज पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. आम्ही भारत सरकारसोबत चर्चा करत आहोत आणि भारतात आमची सिंगल डोस देण्याची क्षमता कशी वाढवायची हे पाहत आहोत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका