शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

CoronaVirus : इटलीत एका दिवसात जवळपास 1000 जणांचा गेला जीव; मृत्यूचं तांडव थांबता थांबेना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 10:39 IST

कोरोनाने इटलीमध्ये 970 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला असून, पुन्हा एकदा भयानक विक्रम नोंदविला गेला आहे.

रोमः कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसनं कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाने इटलीमध्ये 970 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला असून, पुन्हा एकदा भयानक विक्रम नोंदविला गेला आहे. जगभरात या धोकादायक विषाणूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये अमेरिकाही आघाडीवर आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून, एका दिवसात 569 लोकांचा मृत्यू झाला. यासह येथे एकूण मृत्यूची संख्या 4,934वर गेली आहे.दुसरीकडे महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा  आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 1544 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात अमेरिकेत सुमारे 18 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 345 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 717 एवढा झाला आहे. एका दिवसात 970 जणांचा मृत्यू ताज्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी इटलीमध्ये मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत एकाच दिवसात 970 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे युरोपियन देशात मृतांचा आकडा 9,134 वर गेला आहे. तसेच 86,498 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर केवळ 10,950 लोक बरे झाले आहेत. या आठवड्यात दोनदा आकडेवारी कमी झाल्याने देशातील वैद्यकीय कर्मचारी काहीसे निश्चिंत आहेत, पण पुन्हा एकदा परिस्थिती विदारक बनली आहे. तथापि, संसर्गाचे प्रमाण मागील 8% वरून 7.4% पर्यंत खाली आले आहे.आता गोष्टी आणखी बिघडतीलतज्ज्ञांचा अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत इटलीमध्ये कोरोना विषाणूची लागण शिगेला पोहोचेल, परंतु आणखी चार आघाडीच्या डॉक्टरांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर इटलीच्या प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे की हे संकट अद्याप संपलेले नाही. राष्ट्रीय आरोग्य संस्थांनी खबरदारीचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा सल्ला दिला असून,त्यानुसार इटलीतील लॉकडाऊन तीन एप्रिलपर्यंत वाढवण्यात येऊ शकतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याItalyइटलीchinaचीनAmericaअमेरिका