शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
5
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
6
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
7
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
8
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
9
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
10
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
11
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
12
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
13
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
14
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
15
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
16
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
17
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
18
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
19
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

CoronaVirus: वाटलं होतं, आता मी मरणार!; कोरोनाबाधित डॉक्टरची साडेतीन आठवडे झुंज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 4:14 AM

रुग्णांवर उपचार करत असताना त्यांना कोरोनानं गाठलं. लागण झाली आणि तब्येत इतकी खालावली की ते साडेतीन आठवडे कोमात गेले. सगळं संपल्यातच जमा होतं. ​​​​​​​

- बेल्जिअमजगण्याचे आनंद छोटे असतात आणि तेच महत्त्वाचे आणि अस्सल असतात हे माणसाला जाणवायला लागलं तो हा काळ. बेल्जिअम डॉक्टरची ही गोष्ट ब्रसेल्स शहरातली. डॉ. अ‍ॅण्टोनी ससेन, वय वर्षे ५८. मूत्रविकारतज्ज्ञ. आजवर अनेक रुग्ण पाहिले. मरण काही पाहिलं नव्हतं असं नाही; मात्र बेल्जिअममध्ये कोरोनानं उडविलेला हाहाकार सगळ्यांनाच विषण्ण करून टाकणारा आहे. त्याला हे डॉक्टरही अपवाद नाहीत. ते व त्यांचे सहकारी श्वसनविकार, त्यातून मूत्राशयाचे होणारे विकार यासाठीचे उपचार करीत होतेच. मात्र, त्याच काळात त्यांना कोरोनानं गाठलं. लागण झाली आणि तब्येत इतकी खालावली की ते साडेतीन आठवडे कोमात गेले. सगळं संपल्यातच जमा होतं.पण, कोरोनाशी ही लढाई ते जिंकले आणि कालच त्यांना अतिदक्षता कक्षातून बाहेर आणलं. त्यानंतर डेल्टा कायरॅक हॉस्पिटल जिथं ते काम करतात, तिथूनच त्यांनी परिजनांसह सर्वांशीच व्हिडिओ संवाद साधला. ते सांगतात, ‘मलाही एका क्षणी वाटलं होतं की, संपलं, आता आपण मरणार! आता या काळझोपेतून आपण कधीही उठणार नाही! मात्र एकीकडे असं वाटत असताना दुसरीकडे मी मनात स्वत:ला सांगत होतो की, ऊठ, जागा हो, तुला जगायचं आहे. कामं आहेत, तू असा झोपून कसं चालेल..’ ही जगण्यामरण्याची झुंज अंतिमत: ते जिंकले आणि उठून बसले. तो उठून बसण्याचा, पहिल्यांदा डोळे उघडण्याचा अनुभव ते सांगतात, ‘आजवर आयुष्यात मला कधीही इतका आनंद झाला नव्हता. मी डोळे उघडले तर समोर माझे सहकारी डॉक्टर उभे होते. त्यांचे हसरे चेहरे पाहिले, त्यावेळी शब्दात नाही सांगता येणार काय वाटलं. विलक्षण होतं ते! मी जगलो, जागा झालो ते कसं असा विचार केला तर वाटतं एकीकडे मरण उभं होतं. माझे वडील चार वर्षांपूर्वी गेले, ते मला दिसले. मी त्यांच्याशी बोलत होतो. दुसरीकडे मला वाटत होतं की, हा आपला रस्ता नाही. आपल्याला जगायचं आहे.’जगण्यामरण्याची सीमा ओलांडून ते आले आणि ते साऱ्या जगाला एकच गोष्ट सांगताहेत, ‘आता एकच इच्छा आहे, एकदा माझ्या कुटुंबाला कडकडून मिठी मारायची आहे. मला लागण झाली तसं मी त्यांना फक्त लांबून पाहतो आहे. आता बरा झालो की मी त्यांना मिठी मारणार आहे.’आपली माणसं, ती सोबत असणं, त्यांचा स्पर्श, त्यांना मिठी मारून सांगणं की मी आहे, तुम्ही आहात माझ्यासाठी हे सारं किती मोलाचं असतं, पण एरव्ही त्याची किंमत नसते. ती मरणाच्या दारात या डॉक्टरांनाच नाही आता सगळ्यांना कळते आहे. बेल्जिअममध्ये तर कोरोनाने मरणाचा चक्रव्यूह आखलाय. आजपर्यंत ३८,४९६ जणांना बाधा झाली, तर ५,६३८ लोक मृत्युमुखी पडले आहेत. जगण्याची लढाई अखंड चालू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या