शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या मदतीला ‘ग्रेस’ - रोबो नर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 05:49 IST

Coronavirus: कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा त्यावर कोणता उपचार प्रभावी ठरेल हे समजण्यासाठी बराच कालावधी गेला. सतत हात धुणे, मास्क वापरणे आणि मुख्य म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे पालन हे पहिले उपाय अत्यंत प्रभावी ठरतील.

- प्रसाद ताम्हनकर(prasad.tamhankar@gmail.com)कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा त्यावर कोणता उपचार प्रभावी ठरेल हे समजण्यासाठी बराच कालावधी गेला. सतत हात धुणे, मास्क वापरणे आणि मुख्य म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे पालन हे पहिले उपाय अत्यंत प्रभावी ठरतील. याकाळात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोक अनोळखीच काय; पण ओळखीच्या लोकांच्या संपर्कातदेखील येण्याचे टाळत होते. डॉक्टर, पोलीस यासारख्या ‘कोरोना योद्ध्यांनी’ मात्र जिवाची बाजी लावत आपल्या कर्तव्याचे पालन केले. यानंतर बऱ्याच रुग्णालयांनी रुग्णाशी थेट संपर्क न होता त्याचे निदान करता येईल, यासाठी अनेक उपाय योजले. टॉक थेरपी, व्हिडिओ थेरपीद्वारे डॉक्टर रुग्णांचा इलाज करू लागले. या सगळ्याला एक अभिनव जोड मिळाली ती मेडिकल रोबोची! या रोबोच्या मदतीने विविध देशांतले डॉक्टर्स रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता त्यांची तपासणी करू लागले आणि अचूक निदान करू लागले. आता तर हाँगकाँगच्या हॅनसन कंपनीने कोरोना रुग्णांची काळजी घेणारी एक रोबो नर्सच तयार केली आहे. तिचे नाव आहे ‘ग्रेस’! कोरोना रुग्णांना मदत करणाऱ्या हेल्थ वर्कर्सना मदत करणे हा तिचा प्रमुख उद्देश असला, तरी होम आयसोलेट असलेल्या रुग्णांची ती एखाद्या हुशार नर्सप्रमाणे काळजी घेऊ शकणार आहे. यामुळे हेल्थ वर्कर्स रुग्णाच्या प्रत्यक्ष संपर्कापासूनदूर राहू शकतील व रुग्णाचीदेखील आबाळ होणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावरत आधारित या ‘ग्रेस’च्या छातीत एक थर्मल कॅमेरा लावलेला असून, त्याद्वारे ती रुग्णाचे टेंपरेचर चेक करू शकणार आहे, तसेच ते रीडिंग डॉक्टरांनादेखील वेळोवेळी पाठवीत राहणार आहे. बायो रीडिंगबरोबरच रोबो नर्स ‘टॉक थेरपी’ व इतर उपचारांमध्ये मदत करण्यासाठीदेखील सक्षम आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने रुग्णाच्या  प्रश्नांना इंग्रजी, मेंडेरीन आणि कॅटोनिज भाषेत  उत्तरेदेखील देणार आहे. आपल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी चेहऱ्यावरील ४८ प्रकारचे हावभाव समजण्याची ‘ग्रेस’ची क्षमता आहे, हे विशेष. कोरोनाकाळात घरात बसून असलेल्या किंवा विलगीकरणात असलेल्या अनेक रुग्णांच्या मन:स्थितीवर अत्यंत वाईट परिणाम झालेले आहेत, येणाऱ्या काळात एखाद्या नर्सप्रमाणे काळजी घेणारी, मित्रासारखी सतत बरोबर राहून संवाद साधणारी ग्रेस वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वाचे स्थान मिळवील असा तिच्या उत्पादकांचा दावा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याscienceविज्ञान