शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

Coronavirus : जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल स्वत: गेल्या होम क्वारंटाइनमध्ये, भेटलेल्या डॉक्टरला झाला होता संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 06:00 IST

Coronavirus : रविवारी टीव्हीद्वारे देशाला उद्देशून भाषण केले होते. त्यानंतर त्यांना डॉक्टरला संसर्ग झाल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे त्यांनी होम क्वारंटाइनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

बर्लिन : जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल होम यांनी स्वत:हून होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. मर्केल यांना अलीकडेच एक डॉक्टर भेटले होते. त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे तपासणीत सिद्ध झाल्यानंतर अँजेला मर्केल यांनी स्वत: होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. त्या शुक्रवारपासून आहेत. अँजेला मर्केल यांना संसर्ग रोखणारे न्यूमोकोकल व्हॅक्सिन देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांचे प्रवक्ते स्टीफन सिबरेट यांनी दिली. त्यांची ज्या डॉक्टरने भेट घेतली होती, त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले. रविवारी टीव्हीद्वारे देशाला उद्देशून भाषण केले होते. त्यानंतर त्यांना डॉक्टरला संसर्ग झाल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे त्यांनी होम क्वारंटाइनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. स्टीफन सिबरेट यांनी सांगितले की, चॅन्सलर अँजेला मर्केल यांना पुढील काही दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यांना कोणीही भेटू शकणार नाही. त्यांच्या काही चाचण्या करण्यात येणार असून, या संपूर्ण काळात त्या आपल्या घरातूनच काम करणार आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन केल्याबद्दल मर्केल यांनी जनतेचे आभार मानले होते. तिथे आता दोनहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रत्येकाने दुसऱ्या व्यक्तीला भेटताना पाच फूट अंतर ठेवावे, असे सरकारने सांगितले आहे.25हजारांना संसर्गजर्मनीमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २५ हजारांवर गेली आहे. तसेच मृतांचा आकडा १००च्या आसपास असून, २५०हून अधिक लोक आजारातून बरे झाले आहेत, अशी माहिती तेथील सरकारने दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या