शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: अमेरिकेत स्थिती अतिभयंकर होण्याची भीती; रोजचे नवे बाधित लाखाच्या पुढे जातील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 01:17 IST

योग्य वेळी ‘लॉकडाऊन’ लागू न केल्याचा परिणाम

वॉशिंग्टन : कोरोनाची भीषणता ओळखून सरकार व जनता जबाबदारीने वागणार नसेल, तर अमेरिकेतील साथीचा प्रसार भयावह पातळीवर पोहोचून रोज नव्या बाधितांची संख्या एक लाखाच्या पुढे जाईल, असा इशारा साथीच्या रोगांच्या प्रमुख तज्ज्ञाने दिला आहे.अमेरिकेच्या दक्षिण व पश्चिमेकडील राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असताना आणि एक डझनाहूनही अधिक राज्यांत रोज हजारो नवे रुग्ण रुग्णालयांत दाखल होत असताना ‘नॅशनल इस्टिट्यूट फॉर अ‍ॅलर्जी अ‍ॅण्ड इन्फेक्शस डिसीजेस’चे संचालक अँथनी फॉसी यांनी बुधवारी सेनेटच्या आरोग्यविषयक समितीपुढे हा इशारा दिला. मृतांचा आकडा किती वाढू शकेल, याचाही अंदाज मी सांगू शकतो; पण तो सांगितला, तर तुम्ही हादरून जाल, असे फॉसी म्हणाले.

गेल्या आठवड्यात अमेरिकेतील रोजच्या नव्या रुग्णांच्या संख्येने ४७,७९२ हा नवा उच्चांक गाठला. ही संख्या २५ एप्रिलच्या ३४,२०३ या विक्रमी संख्येहून ३० टक्के अधिक होती. फॉसी यांनी रोजची रुग्णसंख्या लाखाच्या पुढे जाण्याचा इशारा दिला आहे. फॉसी यांनी याचा ठपका योग्य वेळी व पूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू न केले जाण्यावर ठेवला. ते म्हणाले की, जेमतेम निम्म्या अमेरिकेत ‘लॉकडाऊन’ केले गेले. या तुलनेत युरोपीय संघातील देशांमध्ये ९५ टक्के ‘लॉकडाऊन’ लागू झाले. फॉसी यांनी व्यक्त केलेली भीती अनाठायी नाही. टेक्सास, अ‍ॅरिझोना, नेवाडा, साऊथ कॅरोलायना, मॉन्टाना, जॉर्जिया व कॅलिफोर्निया या राज्यांमध्ये इस्पितळात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आठवडाभरात २५ टक्क्यांनी वाढले आहे.मास्कवरूनही राजकारणबाहेर जाताना मास्क वापरणे हा कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय आहे; पण अमेरिकेत मास्क वापरण्यावरूनही वाद, मतभेद शिगेला पोहोचले आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच ‘बिलकूल मास्क वापरू नका’, असे सांगत आहेत. त्यामुळे मास्क वापरणे वा न वापरणे हे रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट असण्याचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे.

टॅग्स :Americaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या