शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: प्रायोगिक औषध केवळ दोन तासांत लक्षणे कमी करू शकतात; संशोधनात मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 13:47 IST

coronavirus : औषध दिल्यानंतर दोन तासांत लक्षणं कमी झाल्याचा दावा

ठळक मुद्देऔषध दिल्यानंतर दोन तासांत लक्षणं कमी झाल्याचा दावागंभीर लक्षणं असलेल्या रुग्णाला आठ दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज

कोरोना विषाणूनं काही महिन्यांपूर्वी जगात हाहाकार माजवला होता. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी अद्यापही त्याचा धोका पूर्णपणे संपलेला नाही. अशातच काही ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. परंतु अनेक ठिकाणी अद्यापही त्यावरील औषधांवर संशोधन सुरू आहे. कोरोना विषाणूची गंभीर लक्षणं असलेल्या व्यक्तीच्या शरीरातील प्रसार रोखणाऱ्या एका प्रायोगिक औषधाची मानवी चाचणी आता तिसऱ्या टप्प्यात पोहोचणार आहे. इस्रायलच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या एलोसेटरा या औषधांवर मोठा दावा केला आहे. २१ मधील १९ रुग्णांना सहा दिवसांत चाचणी घेतल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आणि कोणत्याही मृत्यूची नोंद झाली नाही, असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.न्यूयॉर्कमधील हेल्थकेअर कंपनी फेअर हेल्थनं दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात डिस्चार्ज करण्यापूर्वी कोविडच्या रूग्णांनी ४ ते ६ दिवस रुग्णालयात घालवले होते. प्रायोगिक औषध घेणाऱ्या ४९ वर्षीय एका व्यक्तीनं उपचाराच्या काही तासांच आपल्याला काही वेगळेपण जाणवू लागल्याचा दावा केला. त्याला येणारा खोकलाही थांबला आणि श्वासही योग्यरित्या घेता येऊ लागला असं त्यानं म्हटलं. इस्रायलच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दोन दिवसांतच डिस्चार्ज झालेल्या तय्यब या रुग्णानं आपला यावर विश्वासच बसत नसल्याचं म्हटलं. ११ फेब्रुवारी रोजी या चाचणीचे निकाल उत्साहवर्धक असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितलं परंतु हे प्रमाणित संशोधन नसल्यानं औषध प्रभावी सिद्ध होऊ शकत नाही असा इशारा दिला. इस्रायलमध्ये यशस्वी झालेल्या दुसर्‍या टप्प्यातील मानवी चाचणीत सामील झालेल्या ११ रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणं होती.लक्षणं दोन तासांत कमीया व्यतिरिक्त १० रुग्णांमध्ये कोरोनाची सामान्य लक्षणं होती. तर दुसरीकडे ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं गंभीर होण्याची शक्यता होती त्यांना औषधं दिल्यानंतर दोन दिवसांमध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर ज्यांची प्रकृती गंभीर होती त्या रुग्णांना आठ दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गंभीर आणि सामान्य प्रकृतीमध्ये काय फरक होता हे अद्याप वैज्ञानिकांकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. दोन तासांत फरकया चाचणीत सहभागी झालेल्या तय्यब नावाच्या रुग्णाला औषध घेण्यापूर्वी खोकल्याचा आणि श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. "त्यांनी मला औषध दिलं. अचानक दोन तासांनी माझ्या शरीरात काही वेगळं जाणवू लागलं. माझा खोकलाही थांबला आणि श्वास घेण्यात होत असलेला त्रासही थांबला. मला एकदम उत्तम वाटू लागलं होतं. तसंच घामही येणं बंद झालं होतं. मी यावर अद्यापही विश्वास करू शकत नाहीये," असं तय्यबनं इस्रायलमधील चॅनल १३ शी बोलताना सांगितलं. दोन दिवसांपूर्वी मला माझ्या पायांवरही उभं राहता येत नव्हतं. पण आता मी घरी जातोय असं त्यानं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर म्हटल्याचंही त्यानं सांगितलं. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIsraelइस्रायलmedicineऔषधंAmericaअमेरिका