शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीसाठी माणसांवर प्रयोगास अमेरिकेत प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 06:24 IST

सिएटलमधील कैसर परमनन्ट वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना विषाणूच्या साथीवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी प्रयोग सुरू असून या प्रकल्पाला अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थने निधी दिला आहे.

वॉशिंग्टन : जगभर हाहाकार माजविणाऱ्या कोरोना साथीवरील प्रतिबंधक लस बनविण्यासाठी माणसांवरील चाचण्यांना अमेरिकेत सोमवारपासून सुरुवात झाली. या प्रयोगात सहभागी झालेल्यांपैकी पहिल्या व्यक्तीस ही लस टोचण्यात आली.सिएटलमधील कैसर परमनन्ट वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना विषाणूच्या साथीवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी प्रयोग सुरू असून या प्रकल्पाला अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थने निधी दिला आहे. या प्रकल्पाची घोषणा अमेरिकी सरकारने केली नसल्याने त्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अधिकाºयाने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली.कोरोना विषाणूच्या साथीवरील प्र्रतिबंधासाठी माणसांवर होणाºया प्रयोगात ४५ युवकांना ही लस टोचण्यात येणार आहे. या लसीमध्ये कोरोनाचे विषाणू नसल्यामुळे त्याची या युवकांना लागण होण्याची अजिबात शक्यता नाही. ती टोचल्यामुळे मानवी शरीरावर चिंताजनक दुष्परिणाम होत नाही असे आढळून आल्यानंतर या प्रयोगांची व्याप्ती वाढविण्यातकोरोनावर प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी जगभरात अनेक ठिकाणी सध्या प्रयोग सुरू आहेत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. अमेरिकेतील इनोव्हिओ फार्मास्युटिकल्स कोरोना विषाणूवरील प्रतिबंधक लस बनवत असून त्यासाठी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या प्रयोगात सामील झालेल्या काही जणांना लवकरच ही लस टोचली जाणार आहे. असेच प्रयोग मिसुरी येथील कान्सास शहरातील चाचणी केंद्रात तसेच चीन, दक्षिण कोरियामध्येही सुरू आहेत. (वृत्तसंस्था)सर्वत्र वापरास एक-दीड वर्षकोणतीही प्रभावी लस बनविण्यात यश आले तरी त्यानंतर तिचा सार्वत्रिक वापर होण्यास एक ते दीड वर्षांचा कालावधी जावा लागतो, असे नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅलर्जी अँड इन्फेक्शिअस डिसिज या संस्थेचे संचालक डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितले. चीनमध्ये एचआयव्हीच्या औषधांची मात्रा कोरोना विषाणूवर लागू पडते, या दिशेने शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. त्याचप्रमाणे इबोलावर शोधलेले रेमडेसिव्हिर हे औषध कोरोनाला प्रतिबंध करण्यास उपयोगी ठरते का, याचे प्रयोग चीन व अमेरिकेतील नेब्रास्का मेडिकल सेंटरमध्ये सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोनाUnited Statesअमेरिका