शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
5
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
6
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
7
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
9
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
10
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
11
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
12
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
13
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
14
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
15
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
16
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
17
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
18
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
19
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
20
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार

Coronavirus: चीन विश्वासघातकी, द्विपक्षीय संबंधांचा फेरविचार करा; अमेरिकेपाठोपाठ इंग्लंडच्या जनतेनं उठवला आवाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 12:04 IST

चीन या संधीला पश्चिमेकडच्या देशांसोबत प्रतिस्पर्धेच्या स्वरूपात पाहतो. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसनं आतापर्यंत १० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

लंडनः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटत आहेत. कोरोनाचा केंद्रबिंदू चीनमधलं वुहान शहर असल्यानं अमेरिका वारंवार चीनवर हल्लाबोल करत आहे. आता अमेरिकेपाठोपाठ ब्रिटननंही चीनविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटननं चीनसोबत असलेल्या द्विपक्षीय संबंधांचा पुनर्विचार करावा, असं ब्रिटनच्या जनतेबरोबरच गुप्तचर यंत्रणांचं म्हणणं आहे. हायटेक आणि रणनीतिक उद्योगात चिनी गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. ब्रिटिश कूटनीतीतज्ज्ञ आणि चीनमध्ये काम केलेले चार्ल्स पार्टन म्हणाले की, लंडन-बीजिंगच्या द्विपक्षीय संबंधावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण चीन या संधीला पश्चिमेकडच्या देशांसोबत प्रतिस्पर्धेच्या स्वरूपात पाहतो. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसनं आतापर्यंत १० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गार्जियनच्या रिपोर्टनुसार, चीननं या महारोगराईपासून स्वतःचा जवळपास बचाव केलेला आहे आणि तो वन-पार्टी मॉडल तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे बोरिस जॉन्सन आणि त्यांच्या मंत्र्यांनी देशहिताचा विचार करायला हवा. तसेच चीनला कशा पद्धतीनं उत्तर द्यायचं याचा ब्रिटननं आता विचार करायला हवा. ब्रिटनसुद्धा डिजिटल कम्युनिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या चीनच्या हाय-टेक कंपन्यांवर प्रतिबंध लादू शकतो. तसेच त्यांच्या अनेक विद्यापीठांमध्ये असलेल्या चिनी विद्यार्थ्यांना बाहेरचाही रस्ता दाखवू शकतो.बोरिस जॉन्सन हेसुद्धा कोरोना व्हायरसनं संक्रमित असून, त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. चीन कोरोनानं त्यांच्या मृत्युमुखी पडलेले आणि संक्रमितांची आकडेवारी लपवत असल्याची माहिती ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांनी तिथल्या मंत्र्यांना दिलेली आहे. व्हाइस हाऊसपासूनही चीननं महत्त्वाची माहिती लपवलेली असून, आता व्हाइट हाऊस चीनच्या सर्वच बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. गृहमंत्री प्रीती पटेल, संरक्षण मंत्री बेन वॉलेस हेसुद्धा चीनकडे संशयास्पद नजरेने पाहतात. तर डेव्हिड कॅमेरून आणि जॉर्ज ऑस्बोर्न यांनी ब्रिटनमधली चीनच्या गुंतवणूक महत्त्वाची असल्याचं सांगितलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या