शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: भारतावर दबाव आणून आखलेला ट्रम्प यांचा 'तो' प्लान फसला?; शेकडोंचे प्राण धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:07 IST

कोरोनावरील (कोविड-१९) उपचारासाठी हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दबाव आणला होता.

वॉशिंग्टन : कोरोनावरील (कोविड-१९) उपचारासाठी हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दबाव आणला होता. मात्र, या औषधामुळे प्राण धोक्यात येत असल्याचा दावा अमेरिकेतील काही वैद्यक करीत आहेत. मात्र, अशा काही घटना असल्या तरी मोठ्या प्रमाणावर लोकांना फायदा होत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले असून, याबाबत बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने भारताने मार्च महिन्यात हायड्रॉक्झिक्लोरोक्वीनसह विविध प्रकारच्या २६ औषधांना आणि वैद्यकीय वस्तूंच्या निर्यातीस बंदी घातली होती. कोरोनाच्या उपचारामधे हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन प्रभावी ठरत असल्याने ट्रम्प यांनी निर्यातबंदी उठविण्याची भारताकडे मागणी केली होती. भारताने तसे न केल्यास त्यांना जशास तसे प्रत्युत्तर मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.त्यानंतर भारताने निर्यातबंदी मागे घेत अमेरिकेला औषधांचा पुरवठा सुरू केला. मात्र, काही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या औषधामुळे रुग्णांच्या मृत्यूत वाढ झाली आहे. ट्रम्प म्हणाले या बाबत केवळ एकाच रुग्णाचा अहवाल वाईट आला आहे. मात्र, अनेकांना औषधाचा फायदाच झाला आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणेला या प्रकरणी लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकाराचा लवकरात लवकर उलगडा करण्याची सूचनाही दिल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प