शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Delta Variant : डेल्टा विषाणू, संथ लसीकरणामुळे साथीचा धोका कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 05:53 IST

जागतिक आरोग्य संघटना : आफ्रिकेत मृत्यूदर वाढला; २४ तासांत जगात ५ लाख रुग्ण. लोकांनी काळजी न घेता आपापसात मिसळल्यानं धोका पूर्वीइतकाच, सौम्या स्वामिनाथन यांचं मत

ठळक मुद्देलोकांनी काळजी न घेता आपापसात मिसळल्यानं धोका पूर्वीइतकाच : सौम्या स्वामिनाथनआफ्रिकेत मृत्यूदर वाढला; २४ तासांत जगात ५ लाख रुग्ण

जिनिव्हा : डेल्टा विषाणूचा प्रसार तसेच अनेक देशांत धीम्या गतीने होत असलेले लसीकरण, लोकांचे खबरदारी न घेताच आपसात मिसळणे वाढल्याने कोरोना साथीचा धोका पूर्वीइतकाच कायम आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले. आफ्रिकेमध्ये गेल्या दोन आठवड्यांत कोरोनामुळे मृत्यूदर ३० ते ४० टक्क्यांनी वाढला असल्याचे त्यांनी सांंगितले.

त्या म्हणाल्या की, जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाचे सहा विभाग कल्पिले आहेत. त्यापैकी पाच विभागांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत जगभरात पाच लाख नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून ९३०० जण मरण पावले आहेत. हे पाहता या साथीचा वेग मंदावला आहे असे म्हणता येणार नाही. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, लोक अनेक ठिकाणी गर्दी करत आहेत. ते नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत नाहीत. तसेच विविध ठिकाणी प्रतिबंधक नियम शिथील करण्यात आले आहेत. कोरोनाच्या मूळ विषाणूमुळे बाधित झालेली व्यक्ती तीन जणांना बाधित करू शकत असे. पण डेल्टा विषाणूग्रस्त व्यक्ती आठ जणांना संसर्ग देऊ शकते. त्यांनी सांगितले की, काही देशांनी केवळ प्रतिबंधक नियम शिथील केले नाहीत तर मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे यावरील बंधनेही सैल केली. 

चीनमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांत मोठी वाढकोरोना साथ सुरू असतानाच चीनमध्ये आता स्वाइन फ्लूच्या रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. चीनमधून कोरोना साथीचा उगम होऊन ती साऱ्या जगभर पसरली. आता तेथील आफ्रिकन स्वाइन फ्लूचा अन्य देशांत फैलाव होतोय का यावर जागतिक आरोग्य संघटना लक्ष ठेवून आहे.

कोव्हॅक्सिनला WHOची ॲागस्टमध्ये मान्यता?कोवॅक्सिन या भारतीय बनावटीच्या लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष आश्वासक आहेत. या लसीला जागतिक आरोग्य संघटना ॲागस्ट महिन्याच्या मध्याला किंवा अखेरीस मान्यता देण्याची शक्यता आहे असेही त्या संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या. 

कोरोना विषाणू्च्या विविध प्रकारांवर कोवॅक्सिन लस परिणामकारक ठरते का, याचे प्रयोग करण्यात आले. डेल्टा विषाणूविरोधात कोवॅक्सिनची परिणामकारकता कमी आहे असेही निरीक्षण स्वामीनाथन यांनी नोंदविले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाhospitalहॉस्पिटल