शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनामुळे संकटात प्रजा; देशाला वाऱ्यावर सोडून २० महिलांसह पळाला राजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 17:30 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कुटुंबातील काही लोकांना परत पाठवलं असून, एका आलिशान हॉटेलमध्ये स्वतःला होम क्वारंटाइन केलं आहे.

बँकॉकः थायलंडचा वादग्रस्त राजा व्हॅजिरालाँगकॉर्न ऊर्फ राम दशम कोरोना व्हायरसच्या संकटात जनतेला सोडून जर्मनीला निघून गेले आहेत. जर्मनीच्या आलिशान हॉटेलला त्यांनी आपला बालेकिल्ला बनवलं असून, स्वतःसोबत २० महिलांनाही आणलं आहे. त्यासुद्धा त्यांच्यासोबत राहणार आहेत. तसेच ते नोकरांनाही सोबत घेऊन आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कुटुंबातील काही लोकांना परत पाठवलं असून, एका आलिशान हॉटेलमध्ये स्वतःला होम क्वारंटाइन केलं आहे.थायलंडच्या राजानं कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता आपल्या नोकरांसह सेवकांना जर्मनीच्या अल्पाइन रिसॉर्टमधल्या एका आलिशान हॉटेलमध्ये आयसोलेट केलं आहे. राजानं हॉटेल ग्रँड सोन्नेबिचलला पूर्णतः बुक केलं आहे. त्यासाठी त्यांनी तिथल्या जिल्हा परिषदेकडून विशेष परवानगीसुद्धा मिळवली आहे. राजा महा २०१६ला वडिलांच्या निधनानंतर राजगादीवर विराजमान झाले आहेत.  २० महिलांना ठेवणार एका वेगळ्या कक्षातद वीकच्या वृत्तानुसार, थायलंडच्या ६७ वर्षीय  राजानं त्या सर्व २० जणींना एका खोलीत किंवा कक्षात ठेवलं असून, तिथे जाण्यास कोणालाही परवानगी नाही. तसेच मोठ्या संख्येनं नोकरही तिकडेच राहत आहेत. विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता परिसरातील हॉटेल व गेस्ट हाऊस बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु जिल्हा परिषद म्हणते की, पाहुणे एकटेच असून, त्यांचासोबत एक वेगळा गट आहे, म्हणूनच त्यांना परवानगी देण्यात आली आहे.कोरोनाच्या संशयामुळे ११९ लोकांना परत पाठवलेराजाने आपल्या कुटुंबातील ११९ लोकांना थायलंडला परत पाठविले आहे, कारण त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आहे. दरम्यान, या संकटात राजाने जर्मनीत पलायन केल्याबद्दल देशातील हजारो लोक संतप्त झाले आहेत. जनतेनं सोशल मीडियावरून राजावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. देशातील राजावर टीका केल्यास किंवा त्यांचा अवमान केल्याबद्दल १५ वर्षं तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. देशात आम्हाला अशा राजाची काय गरज आहे?, असा हॅशटॅगही सोशल मीडियावर आता ट्रेंड होऊ लागला आहे. जनता कोरोनाशी दोन हात करत असतानाच राजा देश सोडून जर्मनीला पळाल्यानं  जनता भडकली आहे. थायलंडमध्ये आतापर्यंत १२४५ जण संक्रमित झाले आहेत. थायलंडचा राजा फेब्रुवारीपासून देशाच्या बाहेर आहे. राजगादीवर बसण्यापूर्वीच त्यांनी चौथं लग्न केलं होतं.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याThailandथायलंड