शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ...म्हणून पूर्णतः लॉकडाऊन नसतानाही जपानला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 17:01 IST

जपानमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच तिथले पंतप्रधान शिंजो अबे यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. 

टोकियो: कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला असून, अनेक देश प्रभावित झाले आहेत. इटली, अमेरिका आणि स्पेनला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध न झाल्यानं मृतांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वच देशांना या समस्येवर कसं नियंत्रण मिळवायचं हा प्रश्न भेडसावत आहे. अनेक देशातील नागरिक लॉकडाऊनचं काटेकोर पालन करत नाहीत. जपानमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच तिथले पंतप्रधान शिंजो अबे यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. जपानमध्ये कसा झाला कोरोनाचा प्रादुर्भाव?चीनच्या वुहान प्रांतात नोव्हेंबर २०१९मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. जानेवारीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. चीनमधून निघालेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावर २५०० पेक्षा जास्त नागरिक प्रवास करत होते आणि त्याच जहाजावर कोरोनाचे रुग्ण असल्याची बातमी आल्यानं तेव्हा जपानमध्ये एकच खळबळ उडाली. ते जहाज जपानमध्ये थांबविण्यात आल्यानंतर त्यांच्यातील कोरोनाबाधित रुग्णांना वेगळं करून त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू करण्यात आले होते. तिथूनच जपानमध्ये कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. जपानी जनता आहे शिस्तप्रिय?जपानी नागरिक शिस्तीचं पालन करतात. जपानमध्ये मध्यरात्रीसुद्धा नागरिक रस्त्यांवरील सिग्नल तोडत नाहीत. तसेच जपानी नागरिक हे परावलंबी नसल्यानं स्वतःची कामं स्वतःचा करतात, त्यामुळे त्यांच्याकडे नोकर वगैरे जास्त करून नसतात. तसेच जपानमध्ये स्वच्छतेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तिथे अस्वच्छता खपवून घेतली जात नाही. लहान मुलांना सुट्टीच्या दिवशीही उद्यानांमध्ये सफाई कशी करतात, याचं प्रशिक्षण दिलं जातं. देशातील सरकारच्या प्रत्येक नियमांचे पालन जपानी नागरिक करतात.जपानी नागरिक सहसा एकत्रित येऊन चावडीवर गप्पागोष्टी करत बसत नाहीत. तसेच ते एकमेकांना कामाव्यतिरिक्तही फार भेटतही नाहीत. त्याचा फायदा जपानला झाला आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात जपानी लोकही रस्त्यावर हातमोजे आणि मास्क घातलेले दिसतात. जपानमध्ये स्वच्छता आणि आरोग्याला जास्त महत्त्व दिलं जात असल्यानंच या देशानं कोरोनावर मात करण्यात यश मिळवलेलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या