शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

Coronavirus: ब्रिटन, अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण वाढू लागले; इंडोनेशिया, ब्राझीलमध्ये परिस्थिती बिघडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 05:24 IST

अमेरिकेत पुन्हा एकदा डेल्टाचे रुग्ण वाढू लागले आहेत. देशात गुरुवारी ५६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले.

ठळक मुद्देलसीकरणाला गती मिळत नसल्याने अध्यक्ष जो बायडेन यांनी नाराजी व्यक्त केली आहेसध्या ब्रिटनमध्ये सरासरी ७०० लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात आहे.इंडोनेशियात गुरुवारी १४४९ लोकांचा मृत्यू झाल्याने सरकारही हादरले आहे.

लंडन / न्यूयॉर्क : जगात अनेक देशात लसीकरण मोहीम सुरु असली तरी ब्रिटन, अमेरिकेसारख्या देशात कोरोना रुग्ण वाढू लागल्याने काळजी वाढली आहे. जगात रुग्णांची संख्या १९ कोटींच्या वर पोहचली आहे. तर, मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ४१ लाखांवर पोहचली आहे. जगात आतापर्यंत लसीचे ३.७४ अब्ज डोस देण्यात आले आहेत.

अमेरिकेत पुन्हा एकदा डेल्टाचे रुग्ण वाढू लागले आहेत. देशात गुरुवारी ५६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले. लसीकरणाला गती मिळत नसल्याने अध्यक्ष जो बायडेन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. लसीकरणानंतरही रुग्ण वाढत असल्याने काळजी वाढली आहे. सध्या ब्रिटनमध्ये सरासरी ७०० लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात आहे. देशात ८८ टक्के वयस्कांना पहिला डोस आणि ६९ टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. द. कोरियात दिवसाला १६०० हून अधिक रुग्ण आढळत असल्याने भीती निर्माण झाली आहे. इंडोनेशियात गुरुवारी १४४९ लोकांचा मृत्यू झाल्याने सरकारही हादरले आहे. मलेशियात लॉकडाउननंतरही संसर्ग कमी होताना दिसत नाही. 

देशात कोरोनाचे नवे ३९,७४२ रुग्ण भारतात रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे ३९,७४२ नवे रुग्ण आढळले तर ५३५ जणांचा मृत्यू झाला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ४,२०,५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,०८,२१२ झाली असून, एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येत हे प्रमाण १.३० टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३६ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका