तुम्हाला स्वप्नं पडतात का?खूप पडतात का? एरव्हीही पडतात की, आता कोरोना कोंडी झाल्यापासून आणि घरात बसल्यापासून जास्त पडतात.तुम्ही घरातच आहात, कुणाला भेटत नाही, कुठं जात नाही, रात्री झोप उशीरा लागते, दिवसा खूप झोप येते, जड झाल्यासारखं वाटतं,रात्री पडतात तशी दुपारीही स्वप्न पडतात असं होतंय का तुमचं?तरी घाबरू नका, तुम्ही एकटेच काही अपवाद नाही.जगभरात माणसांना या कोरोना कोंडीच्या काळात स्वप्नं पडत आहेत, आणि काहींना त्या स्वप्नं ची भीती वाटते. काही स्वप्नंत खूप घाबरतात, काही दचकतात.ही स्वपA खरी झाली तर काय असं वाटूनही घाम फुटतो. झोप मोड होते.तर यासगळ्याचा अलिकडेच ड्रिम रिसर्च इन्स्टिटय़ूट लंडन आणि हार्वर्ड विद्यापीठ, मॅसॅच्युसेश यांनी एक सर्वेक्षण केलं. त्याचं नाव होतं, ड्रिम सव्र्हे.त्यात सर्वेक्षणात आढळून आलेल्या लक्षणांना त्यांनी नाव ठेवलं आहे, ‘ पॅनडेमिक ड्रिम्स’ अर्थात महामारीची स्वपA.अनेकांनी ट्विट करुन आपल्या स्वप्नं चे अनुभव लिहिले आहेत.आपल्याला काय आणि कशी स्वप्नं पडतात हे सांगितलं आहे. अमूक आवडता माणूस, स्टार, आपला प्रेमाचा माणूस, कुणीतरी जिवाभावाची व्यक्ती आपल्याला घट्ट आलिंगन मारते आहे, आणि आपल्याला तिच्यामुळे किंवा तिला आपल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला अशी स्वप्नं पडत असल्याचंही अनेकांनी नोंदवलं आहे.
coronavirus : काळजीनं जगभर लोकांना पडू लागलीत कोरोनाचीच स्वप्नं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 14:02 IST
अलिकडेच ड्रिम रिसर्च इन्स्टिटय़ूट लंडन आणि हार्वर्ड विद्यापीठ,यांनी एक सर्वेक्षण केलं. त्याचं नाव होतं, ड्रिम सर्व्हे
coronavirus : काळजीनं जगभर लोकांना पडू लागलीत कोरोनाचीच स्वप्नं
ठळक मुद्देस्वप्नांची साखळीही मग कोरोनासारखी तुटत नाही.