शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

CoronaVirus : अवघ्या ५ मिनिटांत होणार कोरोनाचं निदान; सरकारची किट्सला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 1:58 PM

कोरोनाचं निदान करणाऱ्या किट्सची अनेक देशांमध्ये मागणी असून, भारतही ही किट्स जर्मनीकडून सध्या विकत घेतो.

वॉशिंग्टन- कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला आहे. बऱ्याचदा कोरोना झालेली व्यक्ती लवकर समजत नाही. कारण त्या व्यक्तीमध्ये लक्षणं प्राथमिक टप्प्यात सामान्य सर्दी अन् खोकल्यासारखी असतात. कोरोनाचं निदान करणाऱ्या किट्सची अनेक देशांमध्ये मागणी असून, भारतही ही किट्स जर्मनीकडून सध्या विकत घेतो. विशेष म्हणजे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची तपासणी करणारं किट्स आता अमेरिकेनं विकसित केलं आहे. गेल्या  काही दिवसांपूर्वी भारतातल्या पुण्यातल्या कंपनीनं 6 आठवड्यात संशोधन करून 100 टक्के स्वदेशी बनावटीची किट तयार केली. पुणेस्थित मायलॅबने आठवड्यातून 1 लाख किट निर्मिती करण्याचे आश्वासन दिले असून, एका किटनं 100 रुग्णांची तपासणी करता येणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. विशेष म्हणजे देशातल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे(ICMR)नंही याला मान्यता दिली आहे. आता अमेरिकेतल्या ट्रम्प सरकारनंही या किट्सच्या वापराला परवानगी दिली आहे. किट्स फक्त ५ मिनिटांत रुग्णाला कोरोना झाला आहे की नाही, याचं निदान करणार आहे. अमेरिकेतली औषध निर्माता कंपनी एबोटनंही हे किट तयार केलं आहे. अमेरिकेतल्या रेग्युलेटर USFDAनेही त्याला मंजुरी दिली आहे. पुढच्या आठवड्यापासून या किट्सच्या निर्मितीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. नवीन किटला मान्यता- अ‍ॅबॉट कंपनीच्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी वापरलेले नमुने  योग्य असल्याचे आढळले आहेत. यासाठी युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनची परवानगी मिळाली असून, जलद, पोर्टेबल, पॉईंट-ऑफ-केअरची तपासणी केली जाणार आहे. आपल्याला अवघ्या ५ मिनिटांत कोरोना रुग्णाचं निदान करणं शक्य होणार आहे. अ‍ॅबॉटचा दावा आहे की, पॉझिटिव्ह केसची माहिती अवघ्या 5 मिनिटांत कळू शकणार आहे. त्याच वेळी संबंधित व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्यास समजण्यासाठी १३ मिनिटांचा वेळ लागणार आहे. न्यूज एजन्सी ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, अ‍ॅबॉटची नवीन टेस्ट किट गेमचेंजर ठरणार आहेत, कारण सध्या अमेरिका आणि युरोप सारख्या विकसित देशांमध्येही कोरोनाची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा 24-48 सुरू ठेवून चाचणी घेतली जात आहे. ही चाचणी खूप महाग आणि वेळ घेणारी आहे. प्रथम नमुने एकत्र केले जातात. मग प्रयोगशाळेत आरटी-पीसीआरद्वारे चाचणी केली जाते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या