शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: चिनी संशोधकांनी शोधले २४ प्रकारचे कोरोना विषाणू, काही तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 09:14 IST

Coronavirus News: संपूर्ण जगातून कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात नव्याने तपास करण्याची मागणी होत असतानाच कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांबाबतची माहिती समोर आली आहे. 

ठळक मुद्देवेगवेगळ्या प्रजातीच्या वटवाघळांमधून २४ प्रकारचे कोरोना विषाणू एकत्रित केले आहेत यामधील चार विषाणू SARS-CoV-2 सारखे आहेत हे नमुने मे २०१९ पासून नोव्हेंबर२०२० पर्यंत जंगलात राहणाऱ्या वटवाघळांमधून एकत्रित करण्यात आले होते

बीजिंग - कोरोना विषाणूचा उगम नेमका कुठून झाला याचा शोध घेण्याची मागणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यादरम्यान चिनी संशोधकांनी वटवाघळांमध्ये एका नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा शोध लावल्याचा दावा केला आहे. (Coronavirus News)सीएनएनने आपल्या रिपोर्टमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे. नव्याने शोधण्यात आलेल्या कोरोना विषाणूची प्रजाती ही जेनेटिक दृष्ट्या कोविड-१९ (Covid-19) विषाणूच्या खूप जवळ जाणारी असू शकते. संशोधकांनी सांगितले की, दक्षिण पश्चिम चीनमध्ये कोरोना विषाणूच्या घेण्यात आलेल्या नव्या शोधामुळे वटवाघळांमध्ये अनेक प्रकारचे कोरोना विषाणू असू शकतात. ते माणसांनाही बाधित करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. ( Chinese researchers find 24 types of corona virus, some similar to covid-19)

Cell जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये शान्डोंग विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, वेगवेगळ्या प्रजातीच्या वटवाघळांमधून आम्ही २४ प्रकारचे कोरोना विषाणू एकत्रित केले आहेत. यामधील चार विषाणू SARS-CoV-2 सारखे आहेत. हे नमुने मे २०१९ पासून नोव्हेंबर२०२० पर्यंत जंगलात राहणाऱ्या वटवाघळांमधून एकत्रित करण्यात आले होते. वटवाघळांच्या मलमुत्राचे आणि आणि तोंडातील स्वँबचे नमुने घेण्यात आले. चिनी संशोधकांच्या  म्हणण्यानुसार एक विषाणू जेनेटिक दृष्ट्या SARS-CoV-2सोबत बऱ्यापैकी मिळताजुळता आहे. SARS-CoV-2 हा तोच कोरोना विषाणू आहे ज्याने गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. त्यांनी सांगितले की, स्पाईक प्रोटिन वगळता हा विषाणू कोविड-१९शी बऱ्यापैकी मिळताजुळता आहे. याचा स्ट्रक्चर सुद्धा तसाच आहे. जो पेशींना चिकटण्यासाठी विषाणूमध्ये दिसून येतो. 

या संशोधन पत्रात चिनी संशोधक लिहितात की, जून 2020मध्ये थायलंडमध्ये मिळालेल्या सार्स-कोव-२ विषाणूचे परीक्षण केल्यावर असे दिसून येते की, वटवाघळांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव खूप अधिक आहे. काही भागात कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची आवृत्ती खूप अधिक असू शकते. संपूर्ण जगातून कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात नव्याने तपास करण्याची मागणी होत असतानाच कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांबाबतची माहिती समोर आली आहे. 

अमेरिकेसह जी-७ देशांनी याबाबत तपास करण्याची मागणी लावून धरली आहे. चीनच्या वुहान शहरामध्ये कोरोनाच्या संसर्गाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर दीड वर्ष उलटूनही कोरोना विषाणू नेमका कुठून आला याचा शोध लावता आलेला नाही. वुहान येथील प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू लिक झाल्याच्या दाव्यांवर पुढील तपास करण्यात यावा, अशी मागणीही संशोधकांकडून करण्यात येत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय