शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: धक्कादायक खुलासा! राष्ट्रपती जिनपिंग यांनी ७ दिवस गप्प राहून चीनमध्ये पसरू दिला कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 10:29 IST

१४ जानेवारीला कोरोनासंबंधी माहिती मिळालेली होती. ७ दिवस कोरोना पसरत असतानाही त्यांनी अलर्ट जारी केला नाही.

बीजिंगः चीननं कोरोना व्हायरससंबंधी माहिती लपवून ठेवल्याचा अमेरिका वारंवार आरोप करते आहे. चीननं जगासमोर कोरोना विषाणूसंबंधी माहिती उघड न केल्याचाही त्यांच्यावर ठपका ठेवला जात आहे. विशेष म्हणजे अमेरिका करत असलेल्या आरोपात तथ्य असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची माहिती मिळाल्यानंतर ७ दिवस तो व्हायरस शी जिनपिंग यांनी चीनमध्ये पसरू दिला, त्याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. तसेच त्यांनी सात दिवस गप्प राहण्याची भूमिका घेतल्याचंही चिनी कागदपत्रांतून उघड झालं आहे. १४ जानेवारीला कोरोनासंबंधी माहिती मिळालेली होती. ७ दिवस कोरोना पसरत असतानाही त्यांनी अलर्ट जारी केला नाही. एसोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, चिनी सरकारच्या अंतर्गत दस्तावेजातून याचा खुलासा झालेला आहे. चीनच्या आरोग्य यंत्रणांनी १४ जानेवारीलाच सांगितलं होतं की, कोरोना व्हायरसच्या महारोगराईचा आपण सामना करत आहोत. परंतु त्यांनी सात दिवस लोकांना सतर्क केलं नाही. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या महारोगराईशी दोन हात करण्याचा कर्मचाऱ्यांना आदेश दिला होता, परंतु वृत्तवाहिनीच्या माध्यमातून लोकांना सतर्क केलं नाही. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी ७ दिवस लोकांना दिली नाही कल्पनाराष्ट्रपती शी जिनपिंग यांनी २० जानेवारीला या महारोगराईबद्दल लोकांना सांगितलं. तोपर्यंत तीन हजारांहून अधिक लोक या व्हायरसनं संक्रमित झाले होते. चीनच्या रोग नियंत्रण केंद्राच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीची नोंदणी केली नाही. परंतु एपीसीकडून प्राप्त झालेला बुलेटिनमध्ये याचा खुलासा झाला होता. ५ जानेवारी ते १७ जानेवारीदरम्यान रुग्णालयात शेकडो रोगी भरती करण्यात आले होते. फक्त वुहानमध्येच नव्हे, तर जगभरात असे होत होते. वुहानच्या डॉक्टर्स अन् वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे केला कानाडोळावुहानमधले डॉक्टर्स आणि नर्सेसनी कोरोना व्हायरसचा प्रसार होत असल्याचे संकेत डिसेंबर २०१९ला दिले होते. परंतु अधिकाऱ्यांनी त्या डॉक्टर आणि नर्सेसची तोंडं बंद केली. तसेच असा इशारा दिल्यानं त्या डॉक्टरांना शिक्षासुद्धा देण्यात आली. अधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांपासून लपवून ठेवलं सत्यअधिकाऱ्यांना कोरोना संक्रमणाची माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी वरिष्ठ नेत्यांपासून ही बाब लपवून ठेवली. चीनच्या बाहेर संक्रमण झाल्याचं पहिलं प्रकरण १३ जानेवारीला थायलंडमध्ये उघडकीस आलं. तेव्हा या महारोगराईचा बीजिंगच्या नेतृत्वाला कल्पना आली. चीनचे आरोग्य अधिकारी मा शिवावेई म्हणाले, कोरोना व्हायरस परदेशात पसरल्यानंतर चीनला पावलं उचलावी लागली. १४ जानेवारीला एक गुप्त फोनसुद्धा करण्यात आला, त्यावरून चीनचे अधिकारीही चिंतीत होते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या