शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाचा सामना करण्यासाठी रुग्णालयं उभारू द्या; चीनची भारताला ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 15:56 IST

Coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी चीनकडून भारताला मदतीची ऑफर

बीजिंग: कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतात मेकशिफ्ट रुग्णालयं उभारण्याचा प्रस्ताव चीननं दिला आहे. चीनच्या वुहानमधून कोरोना जगभरात पोहोचला. वुहानमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी चीननं अतिशय वेगवान पद्धतीनं मेकशिफ्ट रुग्णालय उभारलं होतं. तशाच प्रकारची रुग्णालयं भारतात उभारू शकतो, असं चीननं म्हटलंय. यासाठी चीन सरकारनं केंद्र सरकारशी संपर्कदेखील साधलाय.जगात सात लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून ३४ हजार जणांनी जीव गमावलाय. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत असल्यानं चीननं भारतात मेकशिफ्ट रुग्णालयं उभारण्याचा प्रस्ताव दिलाय. चीन सरकारच्या 'ग्लोबल टाईम्स'नं दिलेल्या वृत्तानुसार, चिनी कंपन्या भारतात मेकशिफ्ट रुग्णालयं उभारण्यासाठी मदत करू शकतात. मात्र चीन खरंच भारताची मदत करू पाहतोय की या मदतीच्या आडून वेगळंच काही करू पाहतोय, असा प्रश्न अनेकांना पडलाय.'चीनच्या काही कंपन्या भारतात आधीपासूनच कार्यरत आहेत. स्थानिकांना औषध पुरवठा करण्यासोबतच मेकशिफ्ट रुग्णालयं तयार करण्याचं कामदेखील या कंपन्या करू शकतात. वुहानमध्येही अशाच प्रकारच्या रुग्णालयांची उभारण्यात आली होती,' असं ग्लोबल टाईम्सनं एका लेखात म्हटलंय. चिनी कंपन्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यास सुरुवात केल्याचं दिल्लीतल्या चीनच्या दुतावासातले प्रवक्ते जी रोंग यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. कोरोनामधून सावरल्यानंतर चीनने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या इतर देशांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. मात्र चीनचे हे औदार्य भेसळयुक्त असल्याचे समोर येऊ लागले आहे. कोरोनामुळे आरोग्यसेवेचे कंबरडे मोडलेल्या युरोपमधील अनेक देशांना चीनने पाठवलेले टेस्टिंग किट्स निकृष्ट दर्जाच्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनच्या मदतीमागील हेतूबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे. चीनने पाठवलेले टेस्टिंग किट हे सदोष असल्याचे समोर आल्यानंतर स्पेन आणि झेक प्रजासत्ताक या देशांनी चिनी टेस्टिंग किटचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतलाय. सध्या कोरोना विषाणूने युरोपमध्ये थैमान घातलंय. कोरोनामुळे इटलीत 10 हजाराहून अधिक तर, स्पेनमध्ये 6 हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. या संकटामुळे युरोपियन आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनकडून यूरोपीयन देशांना मदतीचा हात पुढे केलाय. मात्र निकृष्ट टेस्टिंग किटमुळे चीनच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झालाय. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन