शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच 25000 लोकांसह रॅली करणार, लॉकडाउन उठवण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 17:55 IST

आपण पुढील आठवड्यात देशभरात विमान सेवा सुरू करणार आहोत. लवकरच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारालाही सुरुवात केली जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देअमेरिकेत बुधवारी 2500 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेपुढील आठवड्यात देशभरात विमान सेवा सुरू करणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहेट्रम्प म्हणाले, लवकरच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारालाही सुरुवात केली जाईल

वॉशिंग्टन : अमेरिकेत गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आणि मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसत आहे. मात्र, असे असतानाही राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प लवकरात लवकर लॉकडाउन उठवण्याच्या आपल्या निर्णयावर कायम आहेत. एवढेच नाही, तर आपण पुढच्या आठवड्यापासून निवडणूक प्रचारालाही सुरुवात करणार असल्याचे ट्रम्प यांनी बुधवारी स्पष्ट केले. यावरच ते थांबले नाही, तर आपण लवकरच 25000 लोकांना सोबत घेून रॅलीही करणार आहोत, असेही ते म्हणाले. 

अमेरिकेत बुधवारी 28000 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 2500 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

CoronaVirus News : अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; आता परत लाखो डॉलर्सची करणार मदत

ट्रम्प म्हणाले, आपण पुढील आठवड्यात देशभरात विमान सेवा सुरू करणार आहोत. लवकरच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारालाही सुरुवात केली जाईल. आपण रॅलींच्या आयोजनासंदर्भातही विचार करत आहोत. तसेच पुढील आठवड्यात आपण एरिझोना येथे जात असल्याचेही ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोरोना व्हायरसमुळे अमेरिका बंद झाल्यानंतर तेथे त्यांचा पहिलाच दौरा असेल. मात्र, हा दौरा अर्थव्यवस्थेवर केंद्रित आहे, ही प्रचार रॅली नाही, असेही ते म्हणाले. याशिवाय नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान आपण लवकरच महत्वाच्या असलेल्या ओहायो राज्याचाही दौरा करणार असच्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

...पण ऐकतील ते ट्रम्प कसले?; 20 वर्षं चाललेल्या व्हिएतनाम युद्धापेक्षा जास्त अमेरिकींचा बळी

'आशा आहे, लवकरच 25000 लोकांसह रॅली करेल' -रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांचे आव्हान आहे. जेवढ्या लवकर शक्य होईल, तेवढ्या लवकर पूर्वीप्रमाणेच प्रचार सभा घेण्याची आपली इच्छा आहे. आशा आहे, की आम्ही लवकरच काही मोठ्या प्रचारसभा घेऊन आणि लोक एकमेकांजवळ बसतील. मी आशा करतो, की आपण पूर्वीप्रमाणेच 25,000 लोकांसह रॅली करू शकू.

मात्र, जोवर कोरोनावरील लस तयार होत नाही, तोवर सोशल डिस्टंसिंगला पर्याय नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तरीही ट्रम्प यांनी अंदाज बांधला आहे, की हे संकट आपोआप टळेल आणि अमेरिका कुठल्याही संकटांचा सामना करायला तयार आहे. लसीशिवाय कोरोनाला कसे संपवता येईल? असा प्रश्न केला असता, ट्रम्प म्हणाले, 'तो संपत आहे. तो लवकरच संपेल.'

धक्कादायक; लॉकडाउनमध्ये बाल्कनीत उभ्या असलेल्या 13 वर्षांचा मुलावर झाडली गोळी, नैरोबीतील घटना

पुन्हा एकदा WHOवर हल्ला -  ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा डब्ल्यूएचओवर हल्ला चढवला. डब्ल्यूएचओ चीनच्या हातचे बाहुले असल्याचे म्हणत, अमेरिका सर्वप्रथम डब्ल्यूएचओसंदर्भात लवकरच शिफारस घेऊन येईल. यानंतर चीनसंदर्भातही अशीच पावले उचलली जातील. आम्ही डब्ल्यूएचओवर नाराज आहोत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याPresidentराष्ट्राध्यक्षUSअमेरिकाUnited StatesअमेरिकाElectionनिवडणूक