धक्कादायक; लॉकडाउनमध्ये बाल्कनीत उभ्या असलेल्या 13 वर्षांचा मुलावर झाडली गोळी, नैरोबीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:57 PM2020-04-29T16:57:44+5:302020-04-29T17:37:21+5:30

नैरोबी पोलिसांच्या या गोळीबारात मारल्या गेलेल्या मुलाचे नाव, यासीन हुसैन मोयो असे आहे.

A 13 year old boy was killed by a police bullet during a coronavirus curfew in kenya sna | धक्कादायक; लॉकडाउनमध्ये बाल्कनीत उभ्या असलेल्या 13 वर्षांचा मुलावर झाडली गोळी, नैरोबीतील घटना

धक्कादायक; लॉकडाउनमध्ये बाल्कनीत उभ्या असलेल्या 13 वर्षांचा मुलावर झाडली गोळी, नैरोबीतील घटना

googlenewsNext
ठळक मुद्देया गोळीबारत 13 वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहेमुलाला गोळी लागल्यानंतर रुग्णालयात नेण्यासाठी वडिलांनी एकतास केली पोलिसांची गयावयाकेनियात कर्फ्यू लगल्यापासून आतापर्यंत 16 जणांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे


नैरोबी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केनियामध्येपोलिसांनी सक्तीने लॉकडाउनची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. नैरोबीच्या एका भागात मंगळवारी आपल्या घराच्या बालकनीत उभ्या असलेल्या एक कुटुंबावर पोलिसांनीगोळीबार केला. या गोळीबारत 13 वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांच्या या गोळीबारात मारल्या गेलेल्या मुलाचे नाव, यासीन हुसैन मोयो असे आहे. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे संपूर्ण कुटुंब घराच्या बालकनीमध्ये उभे होते. यावेळी घराखालून जाणाऱ्या पोलिसांच्या एका तुकडीतील काही पोलिसांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. यात त्यांच्या 13 वर्षांच्या मुलाच्या पोटात गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. मुलाला गोळी लागल्यानंतर त्यांनी त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशा वेळीही पोलीस त्यांचे ऐकत नव्हते. 

Lockdown : ITBPच्या जवानाचं 'हे' कोरोनागीत तुमच्या हृदयाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही

रुग्णालयात जाण्यासाठीही गयावया -
मोयोचे वडील म्हणाले, मुलाला गोळी लागल्यानंतर रुग्णालयात नेण्यासाठी मला पोलिसांची जवळपास एक तास गयावया करावी लागली. कारण कर्फ्यूमुळे त्यांना रुग्णालयात जाऊ दिले जात नव्हते. माझा मुलगा घराच्या बालकनीमध्ये उभा होता. त्याने कर्फ्यूचे उल्लंघनही केले नव्हते, असे असतानाही पोलिसांनी गोळीबार करणे लज्जास्पद आहे. केनियात कर्फ्यू लगल्यापासून आतापर्यंत 16 जणांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.

वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात

हे तर मानवाधिकाराचे खुले उल्लंघन -
एमनेस्टी इंटरनॅश्नलचे केनियाचे डायरेक्टर इरुंगू हाफ्तन यांनी  सीएनएनशी बोलताना सांगितले, की लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आवश्यकतेपेक्षा बळाचा अधिक वापर करत आहे. येथील लोक कोरोनामुळे आधीच दहशतीखाली आहेत. असे असताना, पोलिसांचे अशा पद्धतीने वागणे भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. सोशल मीडियावर, पोलीस जनतेला निर्दयपणे मारत असल्याचे असंख्य व्हिडिओ उपलब्ध आहेत. हे मानवाधिकाराचे खुले उल्लंघन आहे. तर पोलिसांचे म्हणणे आहे, की लोक सातत्याने लॉकडाउन आणि क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. अनेक ठिकाणी तपासणीसाठी जाणाऱ्या पोलिसांवर लोक हल्ला करत आहेत.

Coronavirus : बापरे! मास्क लावला नाही तर तब्बल 8 लाखांचा दंड, 'या' देशाने घेतला निर्णय

Web Title: A 13 year old boy was killed by a police bullet during a coronavirus curfew in kenya sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.