नवी दिल्ली : अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला असून, तिथे या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या ८ लाखांवर गेली आहे. त्यापैकी सुमारे ४३ हजार जण मृत्युमुखी पडले आहेत. जगात कोरोना रुग्णांचा आकडा २५ लाख ३६ हजारांवर गेला आहे. आतापर्यंत या भयावह आजाराने जगभरात १ लाख ७५ हजार जणांचा जीव घेतला आहे. इटलीमध्ये २४ हजार, स्पेनमध्ये २१ हजार ३००, तर फ्रान्समध्ये २० हजार ३०० जण आतापर्यंत मरण पावले आहेत. ब्रिटनमध्येही मृतांचा आकडा १७,४०० झाला आहे.
CoronaVirus: अमेरिकेतील रुग्णांची संख्या ८ लाखांवर; ४३ हजार जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 06:53 IST