शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : अमेरिकेत ३0 टक्के लोकांना घरीच थांबण्याच्या सूचना, आतापर्यंत ४५० बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 06:06 IST

coronavirus : रँड पॉल हे अमेरिकेतील पहिले कोरोनाग्रस्त सिनेटर ठरले असून त्यांच्यावर क्वारंटाइनमध्ये उपचार सुरू आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या ३५ हजारांहून अधिक झाली असून, देशात आतापर्यंत ४५८ जणांचा बळी गेला आहे. साथीला अटकाव करण्याकरिता अमेरिकेतील प्रत्येकी तीनपैकी एका व्यक्तीला घरीच थांबण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे केंटुकी येथील सिनेटर रँड पॉल यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.रँड पॉल हे अमेरिकेतील पहिले कोरोनाग्रस्त सिनेटर ठरले असून त्यांच्यावर क्वारंटाइनमध्ये उपचार सुरू आहेत. त्या देशात न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन या तीन ठिकाणी कोरोनाच्या साथीने कहर माजविला असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, न्यूयॉर्कवासीयांना आवश्यक गोष्टींचा नियमित पुरवठा करण्यात येत असून त्यात कोणतीही कमतरता राहू देणार नाही.न्यूयॉर्कमध्ये १५ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तिथे या साथीमुळे आतापर्यंत ११४ जण मरण पावले आहेत. या साथीमुळे न्यूयॉर्कमध्ये आगामी दहा दिवसांत अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे व साधनांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कमध्ये आणखी व्हेंटिलेटर मिळाले नाही तर मृतांची संख्या वाढू शकते, असे त्या शहराचे महापौर बिल दे ब्लासिओ यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका