शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: सेन फ्रान्सिस्कोत जहाजावर अडकले १३१ भारतीय; सुटकेसाठी आर्त साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 22:37 IST

पुढील १५ दिवस जहाज सेन फ्रान्सिस्कोत; नंतर ऑकलंडला जाणार

- मनोहर कुंभेजकरमुंबई: अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एका जहाजावर १३१ भारतीय कर्मचारी अडकले आहेत. आमचे प्राण वाचवून आम्हाला आपल्या देशात  परत आणा. आम्हाला आमच्या कुटुंबांना भेटायचे आहे, अशी आर्त साद या कर्मचाऱ्यांनी घातली आहे. याप्रकरणी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय नौकानयन मंत्र्यांनी जातीने लक्ष घालून त्यांना लवकर भारतात आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशन या अशासकीय संस्थेचे विश्वस्त अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी केली आहे.हॉलंड अमेरिका लाईनच्या मालकीच्या ग्रँड प्रिन्सेस क्रूझवर १३१ भारतीय खलाशी आहेत. जहाजावरील खलाशांपैकी एकाने संपूर्ण परिस्थिती वसई येथील त्याच्या कुटुंबाला सांगितली. यानंतर कुटुंबातील सदस्य एडलर रॉड्रिंक्स यांनी गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांना आज सकाळी फोन केला. जहाजावरील सर्व 131 कर्मचाऱ्यांना भारतात आणण्यासाठी लवकर हालचाली करण्याची त्यांनी विनंती केली. जहाजाच्या कॅप्टनने सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर आमच्या वैद्यकीय चाचणीचे पैसे  भरण्यास नकार दिल्याने आपल्या देशात येणाचे स्वप्न भंगले. त्यामुळे आम्ही आमच्या जहाजावर परतलो. आता आमचे जहाज ऑकलंडला जाणार आहे. सध्या १५ दिवस तरी आम्ही सॅन फ्रान्सिस्को जवळील समुद्रात आहोत. या ठिकाणी आमचे जहाज नांगरून ठवले आहे. त्यामुळे जास्त उशीर करू नका, आमची सुटका करा अशी विनंती एडलर रॉड्रिंक्स यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.ग्रँड प्रिंसेस क्रूझ हे जहाज अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को बे येथे नांगरलेले आहे. काल (रविवारी) जहाजावरील १३१ भारतीय कर्मचाऱ्यांना चार्टर फ्लाइटद्वारे विमान प्रवासाची सर्व व्यवस्था केली होती आणि या जहाजातून सर्व १३१ भारतीय कर्मचारी उतरलेदेखील होते. यानंतर एका बसने त्यांना सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात आले.  मात्र तिथे सर्व कर्मचारी तासभर बसमध्येच अडकून पडले. उड्डाण करण्यापूर्वी जहाजावरील सदस्यांची वैद्यकीय चाचणी करावी लागेल, असे विमानतळावरील उड्डाण अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र जहाजाच्या कॅप्टनने सदस्यांचा वैद्यकीय खर्च देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना ग्रँड प्रिंसेस शिपकडे परत जावे लागले, अशी कैफियत एडलर रॉड्रिंक्स यांनी मांडल्याचे पिमेंटा यांनी लोकमतला सांगितले.गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे भारत सरकार परदेशात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासातील कर्मचार्‍यांनीही जहाजावर अडकलेल्या कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी सर्व आवश्यक मदत केली पाहिजे, अशी आग्रही मागणी अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी केली.  

टॅग्स :corona virusकोरोना