शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

अमेरिकेत कोरोनाचा वणवा त्यात दंगलीचा भडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 04:57 IST

अमेरिका : उग्र निदर्शनांमुळे ट्रम्प तासभर बंकरमध्ये

वॉशिंग्टन : मिनिओपोलिस या मिनेसोटा राज्याच्या राजधानीत जॉर्ज प्लॉईड या ४२ वर्षांच्या कृष्णवर्णी व्यक्तीचा एका गौरवर्णी पोलीस अधिकाऱ्याने गुडघ्याने गळा दाबून खून केल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत उसळलेली संताप व निषेधाची लाट रविवारी व्हाईट हाऊसच्या अगदी दारात पोहोचली. निदर्शनांची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ‘सिक्रेट सर्व्हिस’ला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलेनिया व १४ वर्षांचा मुलगा बरॉन यांना सुमारे एक तासभर व्हाईट हाऊसच्या खाली तळघरात असलेल्या बंकरमध्ये हलवावे लागले.

व्हाईट हाऊसपासून अगदी जवळ असलेल्या लफायटे पार्कमध्ये जमलेल्या सुमारे एक हजार निदर्शकांचा संताप एवढा अनावर झाला होता की त्यांनी दगडफेक करून परिसरातील अनेक इमारतींचे नुकसान केले व अनेक वाहनांची जाळपोळ केली. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचाही वापर केला. वॉशिंग्टन ‘डीसीमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी १,७०० हून अधिक संघीय पोलीसही तैनात करण्यात आले होते.

जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या निदर्शनांचा रविवारी सलग सहावा दिवस होता. या संतापाचे, निदर्शनांचे लोण अमेरिकेतील १४० शहरांमध्ये पसरले असून, या परिस्थितीमुळे किमान ४० शहरांमध्ये संचारबंदी पुकारण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

आसºयाची ५० वर्षांतील पहिली वेळच्दहशतवादी हल्ल्यासह अन्य काही आणीबाणीचा प्रसंग उद््भवला तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी या अभेद्य बंकरची सोय केलेली आहे. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळात राष्ट्राध्यक्षांना या बंकरचा आसरा घेण्याची वेळ प्रथमच आली. एवढेच नव्हे तर वॉशिंग्टन डीसी या राजधानी क्षेत्रात सुरक्षा दलांनी लागू केलेली सतर्कता ९/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या तोडीची होती. कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे नेते मार्टिन ल्युथर किंग (ज्यू.) यांच्या हत्येनंतर सन १९६७ मध्ये उसळलेल्या सामाजिक असंतोषानंतर आताचा अमेरिकेतील उद्रेक तीव्र व व्यापक असल्याचे मानले जात आहे....आणि पोलिसांनी गुडघे टेकलेहे आहेत अमेरिकेच्या फ्लोरिडामधील पोलीस. जॉर्ज प्लॉईड यांच्या मृत्युनंतर अमेरिकेत निदर्शने सुरु आहेत. एका रॅलीदरम्यान या पोलिसांनी अक्षरश: गुडघे टेकविले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका