शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एकच नंबर! कोरोनावर येतेय 'सुपरव्हॅक्सीन', ना व्हेरिअंटची झंझट, ना राहणार महामारीचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 14:59 IST

कोरोनावर आता जालीम इलाज करायचं वैज्ञानिकांनी ठरवलं आहे आणि एक जबरदस्त लस शोधून काढलीय.

कोरोना महामारीचा सामना करताना जगभरात आता कोरोनाच्या विविध व्हेरिअंटमुळे डोकेदुखी वाढताना दिसत आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे विविध प्रकार आता समोर येत आहेत आणि त्यामुळे चिंता वाढली आहे. पण यासर्वांवर जालीम इलाज करायचं वैज्ञानिकांनी ठरवलं आहे आणि त्यादृष्टीनं काम देखील सुरू झालं आहे. 

वैज्ञानिक सध्या अशा कोरोना विरोधी सुपरव्हॅक्सीन तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत की ज्यामुळे कोरोनाचे सर्व व्हेरिअंट संपुष्टात येतील. इतकंच नव्हे, तर भविष्यात महामारीला रोखण्यासाठी देखील या लसीची मदत होईल. 

पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार वैज्ञानिक सध्या अशा लसीवर काम करत आहेत की जी कोविड-१९ सोबतच कोरोनाच्या इतर सर्व प्रकारांवर प्रभावी ठरू शकेल. वैज्ञानिकांकडून या लसीची चाचणी सध्या उंदरांवर केली जात आहे. अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी आता यावर संशोधन सुरू केलं आहे. भविष्यात आणखी कोणता विषाणू हाहाकार करेल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला आतापासूनच विचार करायला हवा, असं वैज्ञानिकांनी म्हटलं. 

कोरोना विषाणूच्या प्रवर्गातील प्रत्येक प्रकार नष्ट करणारकोरोना व्हायरससोबतच त्याच्या सर्व प्रकारांना नष्ट करेल अशा लसीची निर्मिती केली जात आहे. या लसीमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या सर्वच महामारीच्या संकटावर मात करता येईल. या लसीला सेकंड जनरेशन लस असं संबोधण्यात येत आहे. कोरोनाच्या मूळावर घाव करुन या विषाणूच्या सर्व व्हेरिअंटवर ही लस प्रभावी ठरते. याच प्रवर्गातील दोन व्हेरिअंटनं गेल्या दोन दशकांमध्ये जगात हाहाकार केला आहे. एक म्हणजे सार्स आणि दुसरा कोविड-१९ 

मानवी चाचणी केव्हा सुरू होणार?वैज्ञानिकांनी तयार केलेल्या लसीची उंदरांवर चाचणी घेण्यात आली. यात उंदरांमध्ये अँटीबॉडीज तयार होत असल्याचं दिसून आलं आहे. यात स्पाइक प्रोटीनचा सामना करू शकेल अशा अँटीबॉडीज तयार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. चाचणी घेण्यात आलेले उंदीर सार्स आणि कोविड-१९ विषाणूनं पीडित उंदीर होते. यासर्वांची सविस्तर चाचणी सुरू असून सर्व योग्य राहिलं तर पुढील वर्षात याची मानवी चाचणी केली जाऊ शकते, असं सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या